Tarun Bharat

हिंडलगा कारागृहातील कच्च्या कैद्याचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कच्च्या कैद्याचा बुधवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता.

अविनाश सखाराम कांबळे (वय 31) मूळचा राहणार स्तवनिधी, ता. निपाणी असे त्याचे नाव आहे. संकेश्वर पोलिसांनी चोरी प्रकरणी त्याला अटक करून हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.

आजारामुळे 29 मार्च 2020 रोजी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करायचा की एपीएमसी पोलीस स्थानकात यासंबंधी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

Related Stories

घरांना मंजुरी पण निधीचा अभाव

Omkar B

काकती येथील शिवप्रेमींकडून गडकोट मोहीम

Amit Kulkarni

साहित्य संमेलनासाठी कडोलीनगरी सज्ज

Patil_p

सदाशिवनगरात सीडी कोसळली; दुरुस्तीची मागणी

Amit Kulkarni

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम

Patil_p

शहरातील सिग्नल पुन्हा कार्यरत

Amit Kulkarni