Tarun Bharat

हिंडलगा येथील जवानाला राष्ट्रपतींकडून लेफ्टनंट पद बहाल

      बेळगाव येथील हिंडलगा गावच्या जवानाला  74 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून  लेफ्टनंट पद बहाल करण्यात आले  आहे.

     सुभेदार मेजर चंद्रकांत रामा कडोलकर हे भारतीय सैन्यात 18 एप्रिल 1988 रोजी भरती झाले. या काळात त्यांनी देशसेवेसाठी आपले  कर्तव्य चोख बजावले. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम नागालँड,  पंजाब या ठिकाणी अनेक वर्षे सेवा बजावली.

तसेच त्यांनी  जबलपूर मध्ये असताना भारतीय सैन्यात इन्स्पेक्टर म्हणून काम पहिले आहे. तसेच त्यांना दोन वेळा जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ हे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.

   याबरोबरच डायरेक्टर जनरल नॅशनल सिक्मयुरिटी गार्ड चे प्रशस्तीपत्रक देऊन  सन्मानही करण्यात आला आहे. यामुळे भारतीय सैन्याने  त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून  राष्ट्रपतीं कडून त्यांना लेफ्टनंट पद बहाल  करण्यात आले आहे . येत्या 31 ऑगस्ट 2020 रोजी ते आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होणार आहेत. यापूर्वी त्यांना हे पद मिळालेले आहे.

Related Stories

नागराज बशीडोणी ‘कर्नाटक केसरी’चा मानकरी

Amit Kulkarni

मालवाहू टिप्परचा टायर फुटल्याने टिप्पर दुभाजकावर धडकला

mithun mane

मण्णीकेरी येथे मुलीसह मातेची आत्महत्या

Amit Kulkarni

आदर्शनगर हिंदवाडी येथे जलवाहिनीला गळती

Omkar B

रुग्णवाहिका पेटविणाऱया 13 जणांना कोरोना

Patil_p

नाईट कर्फ्यू उद्यापासून रद्द

Patil_p