Tarun Bharat

हिंडलगा येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

Advertisements

हिंडलगा : येथील रामदेव गल्लीतील श्रीराम युवक मंडळ व गावातील शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्यावतीने रविवारी (दि. 6) शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या संकटाची जाण ठेवत शासकीय नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी श्रीराम सेना व हिंदुराष्ट्र सेनेचे बेळगाव प्रमुख रविकुमार कोकितकर, ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, महादेव बेळगुंदकर, राकेश मुतकेकर, परशराम कुडचीकर, चंद्रकांत बांदोडकर, नागेश सरप, संदीप किल्लेकर यांच्यासह शिवप्रेमी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.  

Related Stories

जिल्हय़ात प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटणार

Patil_p

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ राजीनामा देईन : मंत्री श्रीरामुलु

Abhijeet Shinde

महामार्ग चौपदरीकरणबद्दल आ.निंबाळकर यांनी उठवला विधानसभेत आवाज

Amit Kulkarni

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह

Amit Kulkarni

बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

जुन्या तहसीलदार कार्यालयात स्वच्छतेचा अभाव

Omkar B
error: Content is protected !!