Tarun Bharat

हिंडलगा श्री महालक्ष्मी यात्रेला जिल्हाधिकाऱयांचा हिरवा कंदिल

कोरोनाचे नियम पाळत यात्रा साजरी करण्याचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

हिंडलगा येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मागील वषी होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता 16 मार्चपासून या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. याबाबत यात्रोत्सव कमिटीने जिल्हाधिकाऱयांकडे यात्रा साजरी करण्यास परवानगी मागितली होती. त्याला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हिरवा कंदिल दाखविला असून कोरोनाचे सर्व नियम पाळत यात्रा शांततेने साजरी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंडलगा गावची श्री महालक्ष्मी यात्रा 100 वर्षांनंतर भरविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ मोठय़ा उत्साहाने ही यात्रा साजरी करण्यासाठी लगबग करत आहेत. मागील वषी यात्रेची तारीख जाहीर झाली होती. बऱयाच जणांनी या यात्रेची  संपूर्ण तयारी केली होती. मात्र, कोरोनामुळे ही यात्रा रद्द झाली होती. आता 16 मार्च ते 20 मार्चपर्यंत ही यात्रा भरविली जाणार
आहे.

मंगळवार दि. 16 मार्च रोजी सकाळी 6.47 वाजता अक्षतारोपण होणार आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरापासून रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. बुधवार दि. 17 रोजी सकाळी 8 वाजता रथयात्रेला सुरुवात होऊन दुपारी 2 वाजता गदगेवर विराजमान होईल. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची मानाची ओटी भरली जाणार आहे. गुरुवार दि. 18 रोजी मान्यवरांचा सत्कार तसेच भाविकांना ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. 19 रोजी ओटी भरणे तसेच मान्यवरांचा सत्कार, शनिवार दि. 20 रोजी संध्याकाळी 5 वाजता सांगता समारंभ होऊन श्री महालक्ष्मीचे वाजत गाजत मिरवणुकीने सीमेकडे प्रयाण होणार आहे.

कोरोनाचे नियम पाळा-अध्यक्ष कृष्णा पावशे

जिल्हाधिकाऱयांनी यात्रेला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आम्हाला यात्रा करणे शक्मय होणार आहे. असे असले तरी प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तोंडाला मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ठेवून ही यात्रा साजरी करावी, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे यांनी केले आहे.

Related Stories

अर्थसंकल्प देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करतो!

Patil_p

महांतेशनगर येथे शिक्षण शिबिर उत्साहात

Omkar B

केवळ 155 स्वच्छता कामगारांना सेवेत कायम करणार

Amit Kulkarni

कणबर्गी योजनेचा आराखडा देण्यास टाळाटाळ

Amit Kulkarni

भारतनगर वडगाव परिसरात वृक्षारोपण

Amit Kulkarni

तालुक्मयात खरीप हंगामाची धांदल सुरू

Patil_p