Tarun Bharat

हिंडाल्कोजवळ बस चालकाला मारहाण

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिंडाल्को जवळ परिवहन मंडळाच्या एका बस चालकाला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून ट्रक आणि बस यांच्यात ओव्हरटेक करण्यावरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

सुभाष चौगुला (वय 50) असे मारहाणीत किरकोळ जखमी झालेल्या बस चालकाचे नाव आहे. पुण्याहून कारवारला जाताना निपाणी जवळ ट्रक व बस यांच्यात ओव्हरटेक करण्यासाठी चढाओढ झाली. याच प्रकरणातून हिंडाल्को जवळ बस अडवून चालकाला मारहाण करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासंबंधी शनिवारी रात्री माळमारुती पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीच्या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी जमली होती.

Related Stories

एपीएमसी बाजारात कांदा दरात घसरण

Amit Kulkarni

भैरनट्टी येथे जिल्हाधिकाऱयांचे पहिले ग्रामवास्तव्य

Patil_p

सरकारचा गिरीराज कोंबडय़ांचा पर्याय ठरला फोल

Amit Kulkarni

मनपाच्या संकेतस्थळावरून माहिती गायब

Amit Kulkarni

उचगाव येथे नवीन चेहऱयांना संधी

Omkar B

ड्रेनेजवाहिन्या तुंबल्याने विहिरींचे पाणी दूषित

Amit Kulkarni