Tarun Bharat

हिंदवाडी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंदवाडी येथील स्मशानाजवळ अंदर-बाहर जुगार खेळणाऱया 9 जणांना शनिवारी अटक करण्यात आली. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याजवळून 8 हजार 310 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सर्वोदय मार्ग हिंदवाडी परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक बडगेर, पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून 9 जुगाऱयांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.

विनय मल्लिकार्जुन जवळगी (वय 26, रा. सर्वोदय मार्ग-हिंदवाडी), किरण शिवाजीराव कदम (वय 26, रा. कारभार गल्ली कॉर्नर-वडगाव), चंद्रगौडा नागनगौडा करेगौडर (वय 43, रा. सरस्वतीनगर-काकती), सुनील आनंद मोहनदास (वय 30, रा. आनंदवाडी-शहापूर), अनिल हणमंत घोरपडे (वय 36, रा. समृद्धी कॉलनी, अनगोळ), अभिनंदन अशोक पाटील (वय 31, रा. राधाकृष्ण मार्ग हिंदवाडी), अनंत धाकलू मराठे (वय 22, रा. हिंदवाडी), नटराज नारायण सुतार (वय 22, रा. आनंदनगर-वडगाव), कलमेश बसवराज नायक (वय 20, रा. आनंदनगर-वडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

Related Stories

बारावी परीक्षेत शिक्षकांनाही धार्मिक पोशाखाला निर्बंध

Amit Kulkarni

कोणत्याही परिस्थितीत बिबटय़ाला मारू नये!

Omkar B

यल्लम्मा मंदिरात कंकण मंगळसूत्र सोहळा

Amit Kulkarni

हिंडलगा यात्राकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स कोलेहट्टी षण्मुगम चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करा आणि कोरोनाबाधित रुग्ण ओळखा

Patil_p
error: Content is protected !!