Tarun Bharat

हिंदी पेपरने बारावी परीक्षेची सांगता

विद्यार्थ्यांनी साजरा केला आनंदोत्सव : शेवटच्या पेपरला 265 विद्यार्थी गैरहजर : बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 42 केंद्रांवर पार पडली परीक्षा

प्रतिनिधी /बेळगाव

मागील 25 दिवसांपासून सुरू असणाऱया बारावीच्या परीक्षेची बुधवारी सांगता झाली. शेवटच्या दिवशी हिंदी विषयाची परीक्षा घेण्यात आली. बारावीची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही परीक्षा केंद्रांबाहेर तर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागील काही दिवसांपासून अभ्यासाच्या दडपणाखाली असलेले विद्यार्थी परीक्षा संपल्याने रिलॅक्स दिसून आले.

22 एप्रिल ते 18 मे दरम्यान राज्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 42 केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली. यावषी 20 हजार 817 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. हिजाब प्रकरणामुळे परीक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनही माध्यमातून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पद्धतीने पार
पडल्या.

निकालासाठी जूनपर्यंत पहावी लागणार वाट

बारावीच्या परीक्षा जरी बुधवारी पूर्ण झाल्या असल्या तरी मूल्यमापन प्रक्रियेला पुढील आठवडय़ापासून सुरुवात होणार आहे. तीनही विभागांचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर जूनच्या पहिल्या अथवा दुसऱया आठवडय़ात निकाल लागण्याची चिन्हे आहेत.

जेईई, नीट, सीईटी परीक्षेच्या तयारीला लागले विद्यार्थी

बारावीची परीक्षा जरी पूर्ण झाली असली तरी अद्याप सायन्स विभागाच्या इतर परीक्षा मात्र होणार आहेत. इंजिनियरिंग, मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱया जेईई, नीट, सीईटी या परीक्षांसाठी विद्यार्थी जय्यत तयारीला लागले आहेत. या परीक्षा मे अखेर अथवा जून महिन्याच्या प्रारंभी होण्याची शक्मयता असल्याने विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत.

परीक्षेला अनुपस्थित राहणाऱया विद्यार्थ्यांमुळे पालकांच्या चिंतेत वाढ

बुधवारी बारावी परीक्षेचा शेवटचा पेपर पार पडला. हिंदी विषय परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 7 हजार 295 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यापैकी 7 हजार 30 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. उर्वरित 265 विद्यार्थी हिंदी पेपरला अनुपस्थित होते. यावषी बारावीच्या परीक्षेला अनुपस्थित राहणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने शिक्षकांसोबत पालकांचीही चिंता वाढली आहे.

Related Stories

खानापूर रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे

Amit Kulkarni

रविवारी बाजारात खरेदीला उधाण

Patil_p

आविष्कार उत्सवाला लक्षणिय प्रतिसाद

Patil_p

महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावरून चालण्याची हीच वेळ- उध्दव ठाकरे

Archana Banage

बेंगळूर- बेळगाव मार्गावर धावणार उत्सव स्पेशल रेल्वे

Rohit Salunke

दुर्गम भागातील जामगावला रेशन वाटप करा

Amit Kulkarni