Tarun Bharat

हिंदी महासागरात ऐतिहासिक युद्धाभ्यासास प्रारंभ

चीनची धमकी धुडकावून लावलीः भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आले एकत्र

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

भारत आणि अमेरिकेसह जगातील चार प्रमुख लोकशाहीवादी देशांनी मंगळवारपासून हिंदी महासागरात नौसैनिक अभ्यास सुरू केला आहे. भारतीय सीमेत चीनच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान होत असलेल्या सागरी अभ्यासाचे विशेष महत्त्व आहे. चीनचा आक्षेप धुडकावून लावत यात ऑस्ट्रेलियातही सामील आहे. कुठल्याही स्थितीत भारतासोबत असल्याचे अमेरिकेनेही स्पष्ट केले आहे.

सर्व नौदले स्वतःच्या ताफ्यासह परस्परांना सहकार्य करणार आहेत. क्वाडचे सदस्य देश भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन बाबी समान आहेत. हे सर्व लोकशाहीवादी देश असून ते चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याचमुळे या देशांनी वार्षिक मालाबार सागरी अभ्यासासाठी यंदा चीनच्या नजीकच्या हिंदी महासागराची निवड केली आहे.

दोन टप्प्यात सागरी अभ्यास

24 वा मालाबार सागरी अभ्यास दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय नौदल, अमेरिकन नौदल, जपान मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि रॉफल ऑस्ट्रेलियन नौदल विशाखापट्टणमनजीक बंगालच्या उपसागरात युद्धाभ्यास करणार आहेत. हा टप्पा 3 ते 6 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवल यांनी दिली आहे.

अरबी समुद्रातही शक्तिप्रदर्शन

दुसऱया टप्प्यात नोव्हेंबरच्या मध्यास अरबी समुद्रात नौदल अभ्यास होणार आहे. मालाबार वार्षिक सागरी अभ्यास 1992 मध्ये भारत आणि अमेरिकेच्या सहभागाने सुरू झाला होता. 2015 मध्ये यात जपान सामील झाला होता. यंदा या युद्धाभ्यासात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.

युद्धनौकांचा सहभाग

यंदाच्या युद्धाभ्यासात अमेरिकेच्या नौदलाची गायडेड मिसाइल डेस्ट्रॉयर युएसएस जॉन एस मॅक्केन, ऑस्ट्रेलियन नौदलाच्या हेलिकॉप्टरसह लाँग रेंज फ्रिगेट बालाराट आणि जपानी नौदलाच्या हेलिकॉप्टरसह डेस्ट्रॉयर ओनामी भाग घेत आहे. पहिल्या टप्प्यात भारतीय ताफ्याचे नेतृत्व रियल ऍडमिरल संजय वात्स्यायन करणार आहेत. ते नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग आहेत.

भारत दाखविणार बळ

भारतीय नौदल स्वतःची रणविजय विनाशिका, फ्रिगेट शिवालिक, सुकन्या गस्तनौका, फ्लीट सपोर्ट शिप शक्ती आणि सिंधूराज पाणबुडीसह संयुक्त अभ्यासत भाग घेत आहे. याचबरोबर भारतीय नौदलाचे ऍडव्हान्स जेट ट्रेनर हॉक, लाँग रेंज मेरीइटाम पेट्रोल एअरक्राफ्ट पी-8 आय, डोर्नियर मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट आणि अनेक हेलिकॉप्टर्सही युद्धाभ्यासात भाग घेतील. यादरम्यान कोविड-19 महामारीपासून बचावासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. नौदलांचा उद्देश हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था आणि स्वतंत्र संचार कायम ठेवणे हा आहे.

Related Stories

बेंगळुरात आजपासून एअरो इंडिया शो-2023

Patil_p

गरिबांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी जमा

datta jadhav

काँग्रेसच्या मॅराथॉनमध्ये चेंगराचेंगरी

Patil_p

दानिश सिद्दीकींना दुसऱयांदा पुलित्झर

Patil_p

पुरुषात दिल्ली, ओरिसा, गुजरातचे वर्चस्व राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा

Abhijeet Khandekar

यूपी : कानपुरमध्ये बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar