Tarun Bharat

हिंदूंविरोधात आग भडकविणारा निघाला मुस्लीम

Advertisements

बांगलादेशात हिंदूंविरोधी दंगली : मुस्लिमाने पूजा मंडपात ठेवला होता धर्मग्रंथ

 वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगलादेशात एका दुर्गा पूजा मंडपात मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ ठेवण्यात आल्याच्या घटनेनंतर देशातील हिंदू होरपळून निघाले आहेत. मुस्लीम कट्टरवाद्यांच्या जमावाने कित्येक मंदिरांमध्ये तोडफोड केली असून 7 लोक मारले गेले आहेत. तर आता बांगलादेश पोलिसांनी दुर्गा पूजा मंडपात धर्मग्रंथ ठेवणाऱया आरोपीची ओळख पटविली आहे. हा आरोपी हिंदू नसून मुस्लीम आहे. इक्बाल हुसैन असे त्याचे नाव आहे. इक्बाल हुसैनने सांप्रदायिक सौहार्द बिघडविण्यासाठी धर्मग्रंथाची प्रत मंडपात ठेवली होती.

इक्बाल हुसैन सध्या फरार असून बांगलादेश पोलीस त्याचा शोध घेत आहे.इक्बालच्या दोन सहकाऱयांचीही ओळख पटविण्यात आली आहे. फयाज आणि इकराम हुसैन अशी त्यांची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  इक्बालने 13 ऑक्टोबर रोजी धर्मग्रंथाची प्रत दुर्गा पूजा मंडपात ठेवली होती. दुर्गा पूजा मंडपाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या चित्रणाद्वारे पोलिसांनी इक्बालची ओळख पटविली आहे. या चित्रफितीत इक्बाल जाताना दिसून येतोय. कमिला जिल्हय़ाचे पोलीस अधीक्षक फारुख अहमद यांनी इक्बालचे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे.

सरकार अस्थिर करण्याचा कट

शेख हसीना सरकारविरोधात जमात-ए-इस्लामी बांगलादेशने हा कट रचला होता असे मानले जात आहे. सध्या याकरता पुरावे जमविले जात आहेत. तालिबानप्रमाणेच बांगलादेशातही पूर्णपणे इस्लामी राजवट आणणे हे जमातचे लक्ष्य आहे.

हुसैनने ठेवला धर्मग्रंथ, फयाजची चिथावणी

हुसैनने दुर्गा पूजा मंडपात धर्मग्रंथ ठेवला, त्यानंतर फयाजने तेथील स्वतःच्या समुदायाच्या लोकांना जमवून चिथावले होते. फयाजनेच फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओनंतरच बांगलादेशातील अन्य भागांमध्ये हिंदूंवरील हल्ले सुरू झाले होते. फयाज मागील वर्षीच सौदी अरेबियातून बांगलादेशात परतला होता.

हिंदूंच्या घर, दुकानांची लूट

कमिला जिल्हय़ात या हिंसाचारासंबंधी आतापर्यंत 4 गुन्हे नोंदविण्यात आले असून 41 जणांना अटक करण्यात आली आहेत. यातील 4 जण इक्बालशी संबंधित आहेत. आरोपी इक्बाल सातत्याने स्वतःचा ठावठिकाण बदलतोय. इक्बालला अटक होताच आम्ही या हिंसेमागील सूत्रधाराचा खुला करू असे देशाचे गृहमंत्री असादुज्जमान खान कमाल यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या अनेक जिल्हय़ांमध्ये भडकलेल्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 450 जणांना अटक करण्यात आली आहे.

मंदिरांचे मोठे नुकसान

याचबरोबर सांप्रदायिक हिंसेप्रकरणी 72 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या हिंसाचारादरम्यान हजारोंच्या संख्येत हिंदूंची घरे तसेच दुकानांची लूट करण्यात आली. अनेक मंदिरे आणि दुर्गा पूजा मंडप उद्ध्वस्त झाले आहेत. याचदरम्यान अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने बांगलादेशच्या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करण्याचे आवाहन अमेरिकेच्या आयोगाने केले आहे. बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येत सुमारे 10 टक्के प्रमाण हिंदूंचे आहे.

Related Stories

………………… कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढतेय

Patil_p

गर्दी जमवल्याने ‘सपा’ला नोटीस

Patil_p

ओमिक्रॉनमुळे बेल्जियममध्ये निर्बंधांना विरोध करताना हिंसाचार

Abhijeet Khandekar

टागोरांचे व्हिजन हेच ‘आत्मनिर्भर भारता’चे सार

Omkar B

महिला मंत्र्यासंबंधी कमलनाथ यांच्याकडून आक्षेपार्ह टिप्पणी

Patil_p

तेलंगणापासून केरळपर्यंत येणार भाजपचे सरकार!

Patil_p
error: Content is protected !!