Tarun Bharat

हिंदू धर्म म्हणजे भाजपची मक्तेदारी नाही – टीएमसी

ऑनलाईन टीम / पणजी

लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी धर्माचा दुरुपयोग करण्याचा भाजपचा प्रयत्न, म्हणजे गोवा, गोमंतकीय आणि गोंयकारपण यांचा अपमान आहे, भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवताना, ‘एआयटीसी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी भाजप धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते स्पष्टपणे म्हणाले, ‘भाजपला वाटते की हिंदू धर्मावर त्यांची मक्तेदारी आहे आणि ते योग्य नाही. धर्माचा हा दुरुपयोग आपल्या सभ्यतेच्या भावनेच्या आणि राज्यघटनेच्या आदेशाच्या विरुद्ध आहे.” पणजी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करण्यात आले, या वेळी गोवा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस ट्राजानो डी. ‘मेलो आणि स्वाती केरकर उपस्थित होते.

कोणाचाही मुलाहजा न ठेवता पवन वर्मा म्हणाले, ‘भाजपने धर्माचा वापर करून लोकांमध्ये फूट पाडणे हा गोवा, गोमंतकीय आणि गोंयकारपणचा अपमान आहे. तृणमूल काँग्रेस थेट आणि जोरदारपणे भाजपच्या दृष्टिकोनाच्या विरोधात आहे ज्याचा अर्थ बहिष्कार, हिंसा आणि इतर धर्मांविरुद्ध द्वेष आहे.’ ‘टीएमसी’ हे सर्वसमावेशक, सहिष्णु, बहुवचन, सामावून घेणारे आणि विविधतेसाठी खुले आहे ,दुर्दैवाने भाजपचा हिंदू धर्म हा धर्माचा विपर्यास आहे.

ते हिंदू धर्माचे ‘ठेकेदार’ (कंत्राटदार) आहेत, असे भाजपला वाटते, हे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘भाजपची हिंदू धर्मावर मक्तेदारी नाही. काही ‘ठेकेदारां’ची ही तत्वे लादणे,तसेच हिंदू धर्माची विकृती आणि दुरुपयोग थांबवायला हवा. भाजप ज्या पद्धतीने हिंदू धर्माचा वापर करत आहे, तो महिलांच्या हिताच्या विरोधात आहे. जर स्त्रिया कुंकू लावत नाहीत, तर ते त्यांना हिंदूविरोधी म्हणत त्यांच्या विरोधात मोहीम राबवतात. महिलांनी जीन्स घातली तर ते हिंदू मूल्यांच्या विरोधात असल्याचा दावा करणारे भाजपचे सदस्य आहेत. इतकंच नाही तर बाहेर जेवल्याबद्दल संघ-परिवारातील काही मंडळींनी महिलांना मारहाणही केली. हे कर्नाटकात घडले आहे.

पवन वर्मा पुढे म्हणाले की, भाजप जातीयवादी राजकारण करून हिंदूंचेच अधिक नुकसान करत आहे. त्यांनी विचारले, ‘हिंदूंना अंतहीन राजकीय अस्थिरता हवी आहे का ? हिंदूंना काय करावे, काय खावे, काय परिधान करावे आणि प्रार्थना कशी करावी हे त्यांनी सतत सांगण्याची गरज आहे का ? स्वाती केरकर यांनी पुनरुच्चार केला की, ‘भाजपकडे कोणताही खरा अजेंडा नसल्यामुळे ते निवडणुकीच्या वेळी नेहमीच धर्म आणतात, पण गोव्यातील जनता सजग आहे आणि ते अशा घाणेरड्या युक्त्या पाहू शकतात. गोवा ‘टीएमसी’, इतर पक्षांनी स्वत:ला हिंदू धर्माचे संरक्षक म्हणून दाखविण्याच्या अशा सर्व प्रयत्नांचा निषेध करते, खरेतर तेच गोमंतकियांचा अनादर आणि नुकसान करत आहेत.

Related Stories

तिलारी कालव्याला पाणी आले

Amit Kulkarni

372 अंगणवाडय़ा, 185 शाळांना मिळणार नळ कनेक्शन

NIKHIL_N

कचरा शेड जाळणाऱयांची गय केली जाणार नाही

Amit Kulkarni

देवरुखात 16 रोजी व्यावसायिक शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

Patil_p

बार्देशाला मुसळधार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

नोकरदारांच्या संतापाचा उद्रेक

NIKHIL_N