Tarun Bharat

हिंदू रक्षा अधिवेशनात चार महत्त्वाचे संकल्प

हिंदू महासंघ, मातृशक्ती विभाग, राष्ट्रीय जागृती केंद्रे, धर्म रक्षा दल उभे करणार

प्रतिनिधी /पणजी

गोव्याच्या संघकामाची ष÷य़ब्दी व डॉ. हेडगेवार-कृत संघ-स्थापना शताब्दी याचे औचित्य साधून राज्यात 100 प्रभावी दैनंदिन शाखा निर्माण करण्याबरोबरच, गोवा सुरक्षा मंचच्या राजकीय कार्यासाठी चार वर्षांपूर्वी मुक्त केलेल्या 200 कार्यकर्त्यांना, पुन्हा भारतमाता की जय संघात सामील करून घेण्याचा निर्णय आज येथे झालेल्या ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ राज्य संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी जाहीर केला.

 100 दैनंदिन शाखांव्यतिरिक्त हिंदु-रक्षा व हिंदु-हितासाठी पुढील महत्वाचे चार कृति-संकल्प जाहीर करण्यात आले. त्यात सर्व हिंदु संस्था व संघटना एका व्यासपीठावर आणून ‘हिंदु महासंघ’ स्थापन करणे, प्रौढ व विवाहित महिलांसाठी धर्म-संघटन, सामाजिक प्रबोधन विषयासाठी व युवती तथा बालिकांसाठी संस्कार, धर्मशिक्षण व आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी समर्थ संघटित ‘मातृशक्ती’ विभाग स्वतंत्रपणे उभा करणे, हिंदु समाजावरील आक्रमणे, धोके, आव्हानांची सखोल माहिती व अभ्यास करणारी 20 ‘राष्ट्रीय जागृती केंदे’ संघ-रचित प्रत्येक तालुकास्थानी स्थापन करणे, प्रतिकारक्षम प्रशिक्षित निडर धाडसी युवकांचे ‘धर्म रक्षा दल’ उभे करणे.

  यावेळी व्यासपीठावर उत्तर, मध्य व दक्षिण गोवा जिह्यांचे संघचालक अनुक्रमे पुरुषोत्तम कामत, गोविंद देव, वासुदेव तथा अभय खवटे तसेच राज्य कार्यवाह प्रविण नेसवणकर, सहकार्यवाह दत्ता पु. नाईक व संदीप पाळणी, व्यवस्थाप्रमुख सूर्यकांत गावस, राज्य मातृशक्तीप्रमुख शुभांगी गावडे व मावळते गोसुमं अध्यक्ष नितीन फळदेसाई उपस्थित होते.  संकल्पांतील प्रत्येक विषयाची मांडणी करणारे विनय नाईक, प्रविण नाईक, ऍड. रोशन सामंत, श्रीगणेश गावडे व जितेंद्र आमशेकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानीच कार्य- संकल्प संदर्भातील 5 ठराव मांडले व ओंकार गजरात दोन्ही हात उंचावून ते एकमताने संमत करून घेतले.

  गोसुमं व सध्या गोव्यातील व्यावसायिक, धनाधारित, तत्वहीन व अधःपतित राजकारणाची पार्श्वभूमि गोसुमंचे मावळते अध्यक्ष नितीन फळदेसाई यानी स्पष्टपणे मांडली.

   सर्व गोसुमं कार्यकर्त्याना सामावून घेण्यासाठी व संघकार्य सर्वस्पर्शी सर्वव्यापी करण्यासाठी भारतमाता की जय यंत्रणेची 3 जिल्हे व दोडामार्गसह 20 तालुक्मयांची पुनर्रचना कार्यवाह प्रा. प्रविण नेसवणकर यांनी मांडली. अधिवेशनाचा प्रारंभ ओंकार केळकर यांच्या ‘धर्मके लिए जिए, समाजके लिए जिए, ये धडकने ये श्वास हो, मातृभूमिके लिए, पुण्यभूमिके लिए’ या सांघिक गीताने झाला.

प्रास्ताविक सहकार्यवाह प्रा. दत्ता पु. नाईक (शिरोडा) यानी केले. भारतमाता की जय संघाच्या स्थापनेपासूनच्या कामाच्या वाढत्या आलेखाचा आढावा त्यानी घेतला.

 अधिवेशनाचे सूत्रसंचालन सहकार्यवाह संदीप पाळणी यांनी केले.ऋणनिर्देश प्रा. मनोहर पेडणेकर यानी केला. रक्षाबंथनानिमित्त सर्व प्रतिनिधीनी परस्परांना संघराख्या बांधल्या. अधिवेशनाचा समारोप संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यानी केला. सर्वात शेवटी भगवा ध्वज लावून ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना म्हणून अधिवेशनाची सांगता झाली.

Related Stories

नेवरा खाजन बांधाच्या दुरुस्तीत दिरंगाई

Amit Kulkarni

पणजीसह परिसराला पावसाने झोडपले

Amit Kulkarni

‘थर्टीफस्ट’ला बुडताना आठ पर्यटकांना वाचविले

Patil_p

पिळ्यो धारबांदोडा विद्यालयात बाजार डे उत्साहात

Amit Kulkarni

एफसी गोवाचा जॉर्गे ऑर्तिज दोन सामन्यांसाठी झाला निलंबित

Amit Kulkarni

डोंगरांवरील आगीची निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करा

Amit Kulkarni