Tarun Bharat

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा : सोमय्या

Advertisements

मुंबई /प्रतिनिधी

किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यांनतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान केल आहे .मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात मी फाईल्सचे अवलोकन करताना ज्या माणसाने माझा फोटो काढला तो उद्धव ठाकरे यांचाच माणूस होता. मी हे जबाबदारीने सांगतो असं किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. दोन दिवसात या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची नोटीस पाठवली आहे. ज्यांनी फोटो काढला आणि ज्यांनी अपलोड केला त्यांना नोटीस का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. तसेच, हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा आणि नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याने नोटीस मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.तसेच आज माझा फोटो काढून गेलेत, उद्या येऊन तो गोळी झाडून जातील. त्यामुळे याप्रकरणात आपण केंद्रातील सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार दाखल केली आहे.

Related Stories

नवरीसारखा वर्षा बंगला सोडला; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरेेेंवर बोचरी टीका

Abhijeet Shinde

रिफायनरी १०० टक्के होणारच- मंत्री अजयकुमार मिश्रा

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 4 लाख 76 हजार 964 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन

Rohan_P

राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी: मंत्री बच्चू कडू

Abhijeet Shinde

सोलापूर : बोगस डॉक्टरने घरोघरी पोहोचवला कोरोना, बार्शीत गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!