Tarun Bharat

हिजाबमध्ये अल्ला हू अकबर म्हणणाऱ्या मुलीला पाच लाखांचे बक्षीस

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटकातील पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे मंगळवारी हिजाब परिधान केलेल्या तरुणीचा भगवा परिधान करून आलेल्या काही तरुणांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला. हिजाब घातलेल्या मुलीसमोर जमावाने जय श्री रामच्या घोषणा दिल्या, तेव्हा प्रत्युत्तरात एकमेव मुलीने अल्लाहू अकबरची घोषणा दिली. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आता जमियत उलेमा-ए-हिंदने या विद्यार्थिनीला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले की, ज्या मुलीने हिजाबच्या अधिकारासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तिचाही ही आपण सन्मान करू. जमियतचे सचिव नियाज अहमद फारुकी म्हणाले की, ज्या विद्यार्थिनींनी डझनभर मुलांसमोर अल्लाहू अकबर म्हटले, त्यांनी घाबरलेल्या सर्व मुलींना धीर दिला आहे.

Related Stories

पंजाबमध्ये 614 नवे कोरोना रुग्ण; 22 मृत्यू

Rohan_P

महिलांची स्पेशल बस टॉप गिअरवर; 15 दिवसांत 5500 महिलांनी घेतला लाभ

Abhijeet Khandekar

शहीद जवान दीपक कुमारच्या परिवारास मध्य प्रदेश सरकारकडून 1 कोटी रुपयांची मदत

Rohan_P

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? मलिकांचं नवं ट्विट…

datta jadhav

कोरोना : देशात 21,821 नवे रुग्ण

Rohan_P

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 10 लाखाचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!