Tarun Bharat

हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर योगींचा इशारा; म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे जगभरात पडसात उमटत आहेत. या वादात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळ पासून सुरुवात झाली आहे. त्यांनी मतदानाआधी ट्विट करुन गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही असं म्हटलंय. एएनआयला दिलेल्या मुलखातीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारत आकार घेत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान योगिनीं नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असं त्यांनी म्हटल आहे. नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असंही योगी म्हणाले आहेत.

हिजाबवरुन देशामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगींनी केलेल्या या वक्तव्यामधून त्यांनी सांकेतिक पद्धतीने विरोधकांना इशारा दिलाय. गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असंही योगी म्हणालेत. कर्नाटकमधील हिजाब वादावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी देशातील कारभार हा संविधानानुसारच चालणार असं म्हटलंय. आपण आपले धार्मिक विचार देश आणि येथील संस्थांवर लादू शकत नाही, असंही योगींनी स्पष्ट केलंय.

योगिनीं या प्रकरणावर बोलताना राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी भगवे कपडे घालावेत असं मी म्हणून शकतो का?, तर नाही असं मला म्हणता येणार नाही. लष्करामध्ये कोणालाही कोणताही पोशाख घालण्याची परवानगी देता येईल का? तशाच पद्धतीने शाळांमध्ये ड्रेसकोड आवश्यक आहे, असं योगी म्हणालेत. भारत शरीयतनुसार चालणार नाही तर संविधानानुसार चालणार आहे. तालिबानी विचारसणी असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा योगींनी ट्विटरवरुन दिलाय. ‘गजवा-ए-हिन्द’ का स्वप्न पाहाणाऱ्यांनी असं म्हणत योगींनी हिजाब वादामध्ये विद्यार्थ्यांचं समर्थन करणाऱ्यांना टोला लगावलाय.

Related Stories

मोफत योजनांवर बंदी घालण्याचा मार्ग शोधा

Patil_p

नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेस काढणार ट्रक्टर रॅली

Patil_p

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

prashant_c

राज्यात 3,130 जण कोरोनामुक्त

Patil_p

काँग्रेस-एआययुडीएफ आघाडी संपुष्टात

Patil_p

कोरोना संकटात चेहऱयावर पुटकुळय़ांची समस्या तीव्र

Patil_p
error: Content is protected !!