Tarun Bharat

हिडकलमधून 6.80 टीएमसी पाणी कालव्याला

आजपासून 10 जानेवारीपर्यंत पाणी सोडणार : आमदार भालचंद्र जारकीहोळींची माहिती

वार्ताहर / गोकाक

बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्हय़ाचा भाग्यविधाता हिडकल (ता. हुक्केरी) येथील राजालखमगौडा जलाशयातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी दि. 25 ते 10 जानेवारी दरम्यान 15 दिवस 6.80 टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे अरभावीचे आमदार व केएमएफ दूध संघाचे राज्याध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शासनातर्फे पाटबंधारे विभागास आदेश दिला असून घटप्रभा डाव्या कालव्यातून 2400 क्युसेक्स, घटप्रभा उजव्या कालव्यातून 2000 क्युसेक्स, चिकोडी उपकालव्यातून 550 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून गोकाक, रायबाग मुडलगी, चिकोडी, मुधोळ, जमखंडी बिळगी तालुक्मयातील 3.5 लाख जमिनीतील रब्बी पिकाला उपयुक्त होणार आहे. सध्या हिडकल जलाशयात 45 टीएमसी पाणीसाठा असून गतवषी या काळात 43.77 टीएमसी पाणीसाठा होता. यंदाही जलाशयात पुरेसा पाणीसाठा असल्याने 200 गावांचा पाणीप्रश्न यंदा भेडसावणार नसल्याचा विश्वास जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

Related Stories

हलगा-मच्छे बायपास प्रकरणात शेतकरी ठरले खरे

Patil_p

नो-एंट्री, नो-पार्किंग नियमावली धाब्यावर

Amit Kulkarni

दंड पोलिसांकडून मात्र पावती ग्रा.पं.ची

Patil_p

जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची सांगता

Patil_p

कंग्राळी बुद्रुक समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन

Amit Kulkarni

असंख्य पात्र लाभार्थींची पेन्शन बंद

Amit Kulkarni