Tarun Bharat

हिडकल डॅम भूस्वाधीन कार्यालयावर छापा

Advertisements

संपादित जमिनीची भरपाई देण्यासाठी कमिशनची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

पाटबंधारे योजनांसाठी भू-संपादन केलेल्या जमिनींची भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करून कमिशनची मागणी करणाऱया हिडकल डॅम येथील विशेष भूस्वाधीन अधिकाऱयांना गुरुवारी एसीबीने धक्का दिला आहे. भूस्वाधीन कार्यालयावर छापा टाकण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.

पाटबंधारे योजनांसाठी भू-संपादन केलेल्या जमिनींची भरपाई या कार्यालयातून दिली जाते. संबंधितांना भरपाई देण्यास विलंब होत होता. भरपाई मंजूर करण्यासाठी कमिशनची मागणी केली जात होती.

याबरोबरच नुकसानभरपाई देताना एकाला एक तर दुसऱयाला एक न्याय दिला जात होता. या पार्श्वभूमीवर विशेष भूस्वाधीन अधिकाऱयांच्या हिडकल डॅम येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे.

एसीबीचे पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदिगोप्प, एच. सुनीलकुमार, आर. एफ. देसाई, पी. जी. कवटगी, समीर मुल्ला यांच्यासह 35 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱयांनी या कारवाईत भाग घेतला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. विशेष भूस्वाधीन अधिकाऱयांविरोधात एसीबीकडे तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱयांनी येथील कारभाराची माहिती काढली. सरकारी कामांसाठी लाच, कमिशन मागितले जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे व दलालांकरवी बहुतेक कामे चालतात, यामुळे एसीबीने त्या कार्यालयावर छापा टाकला आहे. या कारवाईत बेळगाव, बागलकोट, विजापूर, गदग जिल्हय़ातील अधिकाऱयांनी भाग घेतला असून शुक्रवारीही तपासणी सुरू राहणार आहे.

Related Stories

लक्ष विचलित करून शेतकरी महिलेला लुटले

mithun mane

बेळगाव जिह्यात बुधवारी कोरोनाचे 41 नवे रुग्ण

Tousif Mujawar

हेस्कॉमचा गलथान कारभार कर्मचाऱयांच्या जीवावर

Amit Kulkarni

पोलीस ठाण्याचे कामकाज चालणार आवारात

Patil_p

‘माती अडवा पाणी जिरवा’साठी अभ्यासदौरा

Amit Kulkarni

नैर्त्रुत्य रेल्वेकडून पावसाळय़ापूर्वी मार्गाची दुरुस्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!