Tarun Bharat

हिमघुबड दिसला तोही 130 वर्षांनी

Advertisements

न्यूयॉर्कवासीयांना दुर्लभ दर्शन

अमेरिकेच्या न्यूयॉकमध्ये आलेल्या एका पाहुण्याचे दर्शन घेण्यासाठी दूर-दूरवरुन लोक येत आहेत. तेथील सेंट्रल पार्कमध्ये पोहोचलेले घुबड 130 वर्षांनी निदर्शनास पडले आहे. हिमघुबड म्हणून ओळखल्या जाणाऱया या पक्ष्याला पाहून प्रशासनासह सर्वसामान्यही अवाप् झाले आहेत. याची देखभाल ठेवण्यासाठी आता पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. हिमघुबडाने केवळ दोनवेळाच येथे दर्शन दिले होते. 1890 मध्ये अखेरचा हिमघुबड येथे दिसून आला होता.

मॅनहॅटन बर्ड अलर्टने या सुंदर पक्ष्याविषयी ट्विट केल्यावर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. सेंट्रल पार्क आणि पूर्ण मॅनहॅटनमध्ये दुर्लभ पक्ष्यांवर नजर ठेवणाऱया बर्ड अलर्टने याची चित्रफित प्रसारित केली होती.

लोक या हिमघुबडाच्या नजीक जात आहेत, तर काही जण या दुर्लभ दृश्याला कॅमेऱयात कैद आहेत. हा हिमघुबड स्वतःची मान कुठल्याही दिशेने 270 अंश कोनात पूर्ण फिरवू शकतो. धुवीय घुबड हाय-आर्क्टिकमध्ये सर्वात मोठा शिकारी पक्षी असतो.

Related Stories

बैरुतमध्ये पुन्हा आगीचा भडका

Patil_p

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

datta jadhav

चीन : खबरदारीचा सल्ला

Patil_p

ओमानच्या राजाचे निधन

Patil_p

‘फायझर’ भारताच्या मदतीला; पाठवणार 7 कोटी डॉलर्सची औषधे

datta jadhav

रॅपिड टेस्टिंग किटबाबत पूर्ण सहकार्य करू; चीनची भूमिका

prashant_c
error: Content is protected !!