Tarun Bharat

हिमाचलमध्ये 8 शहरात तापमान ‘शून्या’खाली

Advertisements

शिमला / वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशात थंडीने कहर सुरू केला आहे. थंडीच्या लाटेमुळे शिमल्यासह राज्यातील 8 शहरातील किमान तापमान उणेपर्यंत गेले आहे. लाहौल आणि स्पिती जिह्याचे मुख्यालय असलेल्या केलाँगमध्ये सर्वात कमी तापमान उणे 8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच राज्यात चंबा येथे 1 अंश, मनाली 1 अंश, भुंतर 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक भागात पाणीपुरवठा करणाऱया पाईपमधील पिण्याचे पाणीही गोठले आहे. गुरुवारी संध्याकाळी अटल बोगद्याजवळ हिमवृष्टीचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली होती. येथे बुधवारी रात्री या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली होती. हवामान खात्याने शुक्रवारी अनेक जिह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. 

Related Stories

बॅडमिंटन मानांकनात प्रणॉय 15 व्या स्थानी

Patil_p

वायू गळती :कंपनीबाहेर ग्रामस्थांची निदर्शने

Patil_p

कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱयांची कर्जे माफ करण्याचा विचार

Patil_p

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे स्फोटक पुस्तक प्रसिद्ध

Patil_p

मेरठमध्ये ऑक्सिजनअभावी 9 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

कॅप्टन-भाजप-ढींडसा यांच्या आघाडीची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!