Tarun Bharat

हिमाचल प्रदेशची मुस्कान झाली आयएएस अधिकारी

ऑनलाईन टीम / सोलन : 


हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील मुस्कान जिंदलने पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा यशस्वीरित्या पास होत हिमाचल प्रदेशचे नाव रोशन केले आहे.


यूपीएससी परीक्षेत मुस्कान जिंदल 87 वे स्थान प्राप्त केले आहे. 22 वर्षीय मुस्कान सोलन जिल्ह्यातील बद्दी गावात राहते. मुस्कानने खूप मेहनत घेत हे यश मिळवले आहे. तिने केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे  तिच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 


मुस्कानचे वडील पवन जिंदल यांनी सांगितले की, माझ्या मुलीने बद्दी गावातील वी आर पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण घेतले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुस्कान 96 टक्के मार्क मिळवत शाळेत अव्वल आली होती. 

Related Stories

पुणे : गणरायाला 500 पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

Tousif Mujawar

चीनमध्ये आहे विचित्र परंपरा

Patil_p

गुलाबी रंगाचे सरोवर

Patil_p

देवदूत ठरलेला ऍम्ब्युलन्सचालक

Patil_p

घनदाट केसांनी होतेय लाखोंची कमाई

Patil_p

तोंडात पेटत्या 150 मेणबत्त्या ठेवण्याचा विक्रम

Patil_p