Tarun Bharat

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे निधन

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. शिमलाच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये वीरभद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला.


मागील तीन महिन्यांत दोन वेळा कोविड 19 मधून वीरभद्र सिंह सुखरूप सुटका झाली होती. मात्र त्यानंतर तब्येत खालावल्याने 23 एप्रिलपासूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्याचे सद्य मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही वीरभद्र सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.


पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना चंदीगढच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर ते 30 एप्रिल रोजी घरी परतले होते. परंतु, घरी पोहचल्यानंतर पुन्हा श्वासोच्छवासात अडथळे जाणवल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


वीरभद्र सिंह यांनी तब्बल सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तर तब्बल नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा ते खासदार बनण्याचा अनोखा रेकॉर्ड त्यांनी कायम केला. सध्या ते सोलान जिल्ह्यातील अर्की मतदारसंघाचे ते आमदार होते.


वीरभद्र सिंह यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, ‘मी निवडणूक लढणार नाही परंतु, मी काँग्रेसी होतो आणि मरेपर्यंत काँग्रेसीच राहीन’. काँग्रेसच्या भरभक्कम शिलेदारांपैंकी एक म्हणून वीरभद्र सिंह यांना ओळखले जात होते.

Related Stories

उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसचे 1 हजार रुग्ण; 80 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

स्टेडियममध्ये श्वान फिरविणाऱया आयएएस दांपत्यावर कारवाई

Patil_p

अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले

Patil_p

वर्ध्यात कार अपघातात आमदारपुत्रासह 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

datta jadhav

शेतकऱ्यांचा २६ रोजी राजभवनांना घेराव

Amit Kulkarni

विषारी मशरूम सेवनाने आसाममध्ये 13 मृत्यू

Patil_p