Tarun Bharat

हिमाचल प्रदेशात ‘आप’ला मोठा झटका

ऑनलाईन टीम/तरुण भरत

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला (BJP) पंजाब (panjab) वगळता चार राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यास यश मिळाले, मात्र पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (aam aadmi party) आपली ताकद दाखवून दिली आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये आपने भाजपा पराभव केला. त्यामुळे देशातील इतर राज्यांमध्ये आता आपने आपली ताकद पणाला लावली आहे. अशात ‘आप’ला हिमाचल प्रदेशमधील (himachal pradesh) नेत्यांनीच जोर का झटका दिला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाबमधील विजयानंतर सर्व राज्यांमध्ये पाय पसरू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाला हिमाचलमध्ये मोठा झटका बसला आहे. आम आदमी पार्टीचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनूप केसरी, संघटन सरचिटणीस सतीश ठाकूर आणि इक्बाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाचे वर्चस्व कमी होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

आम आदमी पार्टीचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनूप केसरी (anup kesari), संघटन सरचिटणीस सतीश ठाकूर (Satish Thakur) आणि इक्बाल सिंग (iqbal singha) यांनी रात्री उशिरा अनुराग ठाकूर (anurag thakur) आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांच्या उपस्थितीत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रवेशानंतर अनूप केसरींची प्रतिक्रिया…
भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अनूप केसरी म्हणाले, आम्ही आम आदमी पक्षासाठी गेली 8 वर्षे काम करत होतो, मात्र असे असतानाही मंडईतील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मानजींच्या रॅलीत आमचे कार्यकर्ते 4 तास उन्हात उभे होते. या गोष्टीकडे सर्वजण हिमाचलचा अपमान म्हणून पाहत आहेत आणि सर्व हिमाचलवासी स्वाभिमानी आहेत. आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आम्हाला जी काही जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू.

Related Stories

शिरोमणी अकाली दलाने कसली कंबर

Patil_p

परब यांना ईडीचे नोटीस ; संजय राऊत म्हणतात, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता

Archana Banage

मध्य प्रदेश : शिवराज सरकारकडून विद्यार्थ्यांच्या खात्यात 137.66 कोटी रुपये

Tousif Mujawar

…तर एक दिवस आत्महत्येची वेळ येईल

datta jadhav

असत्यमेव जयते ! ED कारवाईनंतर संजय राऊतांचं ट्विट

Archana Banage

गुजरातच्या कच्छमध्ये 5.0 तीव्रतेचा भूकंप

Amit Kulkarni