Tarun Bharat

हिमाचल प्रदेश : धक्काबुक्की प्रकरण पाच आमदारांना भोवले

ऑनलाईन टीम / शिमला : 

हिमाचल प्रदेशात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर राजभवनाकडे निघालेल्या राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचा रस्ता आडवून यांच्या गाडीसमोरही घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आमदारांना रोखण्यास गेलेल्या विधानसभा उपाध्यक्ष हंसराज यांना काँग्रेस आमदारांनी धक्काबुक्की केली.

या प्रकाराबद्दल संसदीय कामकाजमंत्री सुरेश भारद्वाज यांनी सभागृहात काँग्रेसचे आमदार मुकेश अग्निहोत्री, हर्षवर्धन चौहान, सतपालसिंह रायजादा, सुंदरसिंह ठाकूर आणि विनयकुमार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. विरोधकांच्या अनुपस्थितीत विधानसभा अध्यक्ष विपीन परमार यांनी हा प्रस्ताव मंजूर करत या 5 आमदारांना 20 मार्चपर्यंत निलंबित केले.

काय होते प्रकरण?

आज सकाळी 11 वाजता राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी अधिवेशनाच्या अभिभाषणाला सुरुवात केली. त्यानंतर 14 मिनिटांत काँग्रेस आमदारांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. राज्यपालांनी अभिभाषणातील 14 मुद्दे वाचले आणि 11.16 वाजता भाषण संपविले. राज्यपाल अभिभाषण संपवून राजभवनात जाऊ लागले. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या कौन्सिल चेंबरच्या गेटवर असलेल्या राज्यपालांच्या गाडीसमोर उभे राहून पुन्हा सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी वातावरण एवढे तापले की, विधानसभा उपाध्यक्ष हंसराज यांना मध्यस्ती करावी लागली. यावेळी हंसराज आणि काँग्रेस आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. 

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द

Tousif Mujawar

अपघातातील सफाई कर्मचाऱयांची संघटनेकडून भेट

Patil_p

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व

Patil_p

अनुष्का शर्माला आली विराटची आठवण; सोशल मिडियावर भावनिक पोस्ट

Archana Banage

विवाह सोहळय़ाशिवाय विवाह नोंदणी अमान्य

Amit Kulkarni

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar