Tarun Bharat

हिमाचल प्रदेश : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

ऑनलाईन टीम / शिमला : 

हिमाचल प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांचे अभिभाषण होईल. आजपासून सुरू होणारे हे अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालेल. अधिवेशनात 17 बैठका असतील.

अधिवेशनादरम्यान, काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस नेत्यांवर दक्षता चौकशीसारख्या मुद्द्यांवरही सभागृह तापणार आहे. या अधिवेशनासाठी 900 हून अधिक प्रश्न आले आहेत.

सुधारित मोटार वाहन कायदा, महानगरपालिका निवडणुकांसह अनेक विधेयके यादरम्यान मांडली जातील. दरम्यान, 6 मार्च रोजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील हा चौथा अर्थसंकल्प असेल. विधानसभा अध्यक्ष विपीन परमार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून अधिवेशनादरम्यान सहकार्य करण्याचे त्यांना आवाहन केले आहे. 

Related Stories

वरवरा राव यांना जामीन संमत

Patil_p

गुजरात : 18 शहरांमध्ये रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू !

Tousif Mujawar

नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार, शहनवाझ यांना मंत्रिपद

Patil_p

पीएफआयचे ‘लक्ष्य’ नरेंद्र मोदी, बिहारमध्ये रचला होता हत्येचा कट

Archana Banage

पेगॅससप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Patil_p

हिंमत असल्यास अटक करून दाखवा!

Omkar B