Tarun Bharat

हिमाचल प्रदेश : 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार लसीकरणाचा दुसरा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / शिमला :


हिमाचल प्रदेशात 10 फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये पोलीस, होमगार्ड, राजस्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. 


यासोबत पहिल्या टप्प्यात ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे, त्या कर्मचाऱ्यांना 14 फेब्रुवारी पासून दुसरी लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण होताच लगेचच तिसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. 

एनएचएमचे निर्देशक डॉ. निपुण जिंदल यांनी सांगितले की, प्रदेशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. आतापर्यंत 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. उद्यापर्यंत हा आकडा पूर्ण म्हणजेच 100 टक्के होईल. त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

error: Content is protected !!