ऑनलाईन टीम / शिमला :
प्रदेशात कोरोना रुग्णांची वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेत प्रदेशात कोरोना कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी बुधवारी आयोजित केलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच प्रदेशात कलम 144 जारी करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशात एकाच ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये 7 मे पासून 16 मे च्या मध्यरात्री पर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. या दरम्यान, आरोग्य, वीज, दूरसंचार, जल आपूर्ति, स्वच्छ्ता आदी सेवा सुरू असतील.
- 10 वी मधील दीड लाख विद्यार्थी पुढील वर्गात


हिमाचल प्रदेश सरकारने राज्य स्कूल शिक्षण बोर्डाच्या इयत्ता दहावीतील जवळपास दीड लाख विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई मॉडेलच्या आधारे गुण देऊन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यासोबतच प्रदेशातील सर्व शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठे 10 मे पर्यंत बंद राहणार आहेत.
या सोबतच लोकांच्या सुविधेसाठी मंडी जिल्ह्यातील धर्मपुर येथे नवीन जल शक्ती सर्किल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऊना जिल्ह्यातील कुटलैहड विधानसभा क्षेत्रात थानाकला येथे एक जल शक्ती डीवीजन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.