Tarun Bharat

हिमाच्छादित प्रदेशात खुल्या जागेत प्रदर्शन

मॉस्कोच्या मालेविच पार्कमधील रम्य दृश्य

प्रदर्शनापर्यंत पोहोचण्यासाठी जंगली वाटेत अंथरले रेड कार्पेट

रशियायच मॉस्को शहराला लागून असलेले मालेविच पार्क अद्याप हिमाच्छादित आहे. या अत्यंत थंड हवामानादरम्यान मालेविच पार्कची निवड कलाकार गेगरी ओरेखोव यांनी स्वतःचे ओपन एअर पेंटिंग एक्झिबिशनसाठी केली आहे.

लोकांना या जंगलाच्या वाटेवरून एक्झिबिशनपर्यंत आणण्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे. आकाशातून हे दृश्य बर्फाच्या कॅनव्हासवर अंतहीन लाल पट्टीसारखे दिसून येते.

तसेही रेड कार्पेटचा अर्थ ‘विजेत्यांचा मार्ग’ असा होतो. सर्वसाधारणपणे नेते, राजघराण्यांच्या सदस्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येत आहे. सोव्हिएत काळापासून लाल रंग हा पावित्र्यासाठी ओळखला जात आला आहे. लॉस एंजिलिसमध्ये ऑस्कर सोहळय़ात किंवा कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेट प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वागताचे प्रतीक ठरले आहे.

रेड कार्पेटयुक्त असलेले मालेविच पार्कमधील हे प्रदर्शन आता चर्चेत आले आहे. येथील ओपन एअर पेंटिंग एक्झिबिशन लोकांदरम्यान कुतुहलाचा विषय ठरले आहे. रशियातील अनेक ठिकाणांहून लोक हे प्रदर्शन पाहण्यासाठी मालेविच पार्कमध्ये पोहोचत आहेत. प्रदर्शनात लोक 250 मीटरचे अंतर रेड कार्पेटवर चालून कापत आहेत.

Related Stories

अमेरिका : तीव्र संकट

Patil_p

समर्थाघरचे ‘मार्जार’

Patil_p

ट्रकमध्ये तेल भरता भरता उघडले नशीब

Patil_p

भारतात धावली पहिली डबलडेकर मालगाडी

Patil_p

असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

Amit Kulkarni

मोल्दोवामध्ये बॉम्बस्फोट, रशियासोबत युद्धाची भीती

Patil_p