Tarun Bharat

हिमा दाससमोर दुखापतीची समस्या

पतियाळा: भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दास हिच्यासमोर आता दुखापतीची समस्या उभी ठाकली असून यामुळे तिला कदाचित टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेला मुकावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 100 मी. धावण्याच्या उपांत्य फेरीत हिमा दासला स्नायू दुखापतीला सामोरे जावे लागले. तिच्या दुखापतीचे स्वरुप अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही.

पतियाळातील स्पर्धेत हिमा दासने महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीतील उपांत्य फेरीत तिसरे स्थान मिळविताना 12.01 सेकंदाचा अवधी घेतला. तिने या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. हिमाची दुखापत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱया भारताच्या महिला रिले संघाला पात्र फेरीसाठी चिंतेची ठरु शकते. महिलांच्या रिले प्रकारात भारतीय पथकात हिमा दाससह दुती चंद, धनलक्ष्मी आणि अर्चना सुसेंद्रन या धावपटूंचा सहभाग आहे. पतियाळातील ही स्पर्धा हिमा दास आणि दुती चंद यांच्यासाठी ऑलिम्पिक पात्रतेची शेवटची संधी असेल.

Related Stories

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

राष्ट्रकुल हॉकीमध्ये भारताची सलामी

Patil_p

कोरोनाविरुद्ध मोहिमेत इस्ट बंगाल, बगानचा सहभाग

Patil_p

विराट-चहल आज आमनेसामने भिडणार!

Patil_p

नदाल, हॅलेपची आगेकूच, प्लिस्कोव्हा पराभूत

Patil_p

उत्तरप्रदेशविरुद्ध मुंबई सर्वबाद 393

Patil_p