Tarun Bharat

हिरेबागेवाडीतील 5 रुग्ण कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाच्या धास्तीमुळे सारेच तणावाखाली आहेत. दररोज किती जणांना लागण होते, या आकडय़ांकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर कोरोना झालेले किती जण बरे होत आहेत, याकडेही लक्ष लागून राहते. मंगळवारी बेळगाव जिल्हय़ाला दिलासा देणाऱया घटना घडल्या आहेत. मंगळवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. हिरेबागेवाडी येथील पाच पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हय़ामध्ये आतापर्यंत कोरोनोबाधित 107 रुग्ण आढळले. त्यामधील 42 जण पूर्ण बरे झाले आहेत. हिरेबागेवाडी येथील एका 80 वषीय वृद्धेचा मात्र मृत्यू झाला आहे. मंगळवारी तब्बल 5 रुग्ण बरे झाले. हे सर्व हिरेबागेवाडी येथील आहेत. त्यामुळे एक सुखद धक्का साऱयांनाच मिळाला आहे. बरे झालेल्या रुग्णांना बिम्स हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले. यावेळी डॉक्टर व कर्मचाऱयांनी त्यांचे स्वागत केले.

हिरेबागेवाडी येथील काही जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. रुग्ण क्रमांक पी-482, पी-485, पी-486, पी-487, पी-494 हे सर्व निगेटिव्ह झाले आहेत. आतापर्यंत 42 जण बरे झाले आहेत. याचबरोबर क्वारंटाईनमध्ये असलेल्या काही जणांनाही घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित तसेच क्वारंटाईनमध्ये असलेल्या 72 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

जिल्हय़ातील 7 हजार 915 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. 1458 जणांना क्वारंटाईनमध्ये तर 72 जणांना हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकूण 6 हजार 620 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामधील 6 हजार 308 जण निगेटिव्ह तर 107 जण पॉझिटिव्ह आहेत. उर्वरितांचे अहवाल येणे बाकी आहे. 

Related Stories

लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांची मराठा लाईट इन्फंट्रीला भेट

Amit Kulkarni

दुकानांची लीज वाढवून द्या!

Amit Kulkarni

साईराज ग्रामीण चषक अयोध्या कडोली संघाकडे

Amit Kulkarni

सकाळच्या सत्रात गर्दी, दुपारी सामसूम

Patil_p

मराठा समाजाचा मागासवर्गीय 2 अ मध्ये समावेश करा

Amit Kulkarni

कट्टणभांवी येथे दोन कासव जप्त

Patil_p