Tarun Bharat

हिरेबागेवाडीत आणखी नऊ जणांना कोरोना

प्रतिनिधी/ बेळगाव

हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली असून पाच महिला, तीन पुरुष व आठ वर्षाच्या मुलाचा समावेश असून या एकाच गावातील बाधितांची संख्या 25 वर पोहोचली आहे, तर जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 54 वर पोहोचली आहे.

गेल्या आठवडय़ात बेळगाव येथून पाठविण्यात आलेल्या स्वॅबची तपासणी रोडावली होती. त्यामुळे रोजच्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावमधील रुग्णांचा उल्लेख नसायचा. बेंगळूरहून येणारे अहवाल उपलब्ध होऊ लागले आहेत. याबरोबरच बेळगाव येथेही स्वॅब तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे तपासणीला वेग आला आहे.

शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या अहवालात राज्यातील 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख होता. त्यामध्ये हिरेबागेवाडी येथील सहा जणांचा समावेश होता. सायंकाळच्या बुलेटिनमध्ये राज्यातील आजच्या दिवसातील बाधितांची संख्या 26 वर पोहोचली. या अहवालात हिरेबागेवाडी येथील तिघा जणांचा समावेश होता.

1 एप्रिल रोजी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्ण क्रमांक 128 च्या संपर्कातून या सर्व नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 45 वर्षीय पुरुष, 38 वषीय पुरुष, 80 वषीय वृद्धा, 55 वषीय महिला, 42 वषीय महिला, 39 वषीय महिला, 20 वषीय तरुण, 30 वषीय महिला व 8 वषीय मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे.

विलगीकरण कक्षात दाखल

या सर्व नऊ जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री 4 महिला व 2 पुरुष यांना तर शनिवारी सायंकाळी 8 वर्षाचा मुलगा, एक महिला व तरुणाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळी ज्या तिघा जणांना 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिलला आणण्यात आले, त्यांची आयएमए हॉलमध्ये तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले.

3 एप्रिल रोजी आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये बेळगाव तालुक्मयातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये हिरेबागेवाडी येथील तरुण, कॅम्प येथील तरुण व बेळगुंदी येथील एका वृद्धाचा समावेश होता. पहिल्या अहवालात उल्लेख असलेल्या रुग्ण क्रमांक 128 च्या संपर्कातून हिरेबागेवाडीत फैलाव वाढला आहे. त्यामुळे या एकाच गावातील रुग्णांची संख्या शनिवारी 25 वर पोहोचली आहे.

दोन दिवसांपूर्वी या एकाच गावातून 222 हून अधिक स्वॅब जमविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हिरेबागेवाडी येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होणार, अशी भीती व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने कोरोना थोपविण्यासाठी या गावात कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी यापूर्वीच हिरेबागेवाडीला प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.

सर्वेक्षणासाठी गेलेल्या अंगणवाडी कार्यकर्तीलाही लागण

कोरोनाग्रस्त हिरेबागेवाडी येथे आरोग्य विभाग, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या एका अंगणवाडी कार्यकर्तीला व एका निवृत्त पोलीस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणात गुंतलेल्या अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले होते. यापैकी एका अंगणवाडी कार्यकर्तीचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आणखी 698 अहवालांची प्रतीक्षा

जिल्हा सर्वेक्षण विभागाने शनिवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार कोरोनाग्रस्त भागातील आणखी 698 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. जिल्हय़ातील 3,054 जण निरीक्षणाखाली असून 989 जणांना चौदा दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 1753 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 983 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 54 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी चौघे जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. सध्या 49 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

नव्या स्वरूपातील परींक्षेसाठी विद्यार्थी सज्ज

Amit Kulkarni

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत बेंगळूर विजेता, हुबळी उपविजेता

Amit Kulkarni

एसकेई, विजया क्रिकेट अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

कागवाड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

नाझर कॅम्प तलावात विसर्जनास बंदी

Amit Kulkarni

ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँक, एटीएमची वानवा

Patil_p