Tarun Bharat

हिरोची ई स्कूटर लवकरच होणार सादर

ओला, टीव्हीएससह बजाजसोबत थेट टक्कर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामधील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणारी कंपनी हिरोमोटो कॉर्प आता इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनी आपली पहिली ई-स्कूटर सादर करणार आहे. कंपनी दीर्घ कालावधीपासून यावर काम करत आहे. कंपनीचे सीएफओ निरंजन गुप्ता यांनी या संदर्भात बोलताना म्हटले आहे, की पहिली इलेक्ट्रिक दुचाकी मार्च म्हणजेच याच महिन्यात सादर करण्यात येणार आहे.

हिरो आंध्र प्रदेशमधील चित्तूर येथील कारखान्यातून हे उत्पादन घेणार असून कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर मागील वर्षात शेअर केला होता. भारतीय बाजारात प्रामुख्याने टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक इलेक्ट्रिक, ओला एस1 या मॉडेलसोबत हिरो मॉडेलची टक्कर राहणार आहे.

बीपीसीएलसोबत चार्जिंग स्टेशन

हिरोमोटो कॉर्प भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांच्यासोबत देशभरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकीसाठी चार्जिंग केंद्रासाठी पायाभूत सुविधा तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि बेंगळूरमध्ये केंद्रे सुरु होणार असून त्यानंतर अन्य 9 शहरांमध्ये चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जास्तीत जास्त उत्पादन सादर करणार

कंपनीच्या सीईओंनी यावेळी म्हटले आहे, की कंपनी इलेक्ट्रिक उत्पादनाव्यतिरिक्त  हिरोमोटो कॉर्प प्रीमियम पोर्टफोलियोमध्ये सर्वाधिक उत्पादने सादर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

चेतकची किंमत वाढली

Patil_p

टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत 26 टक्के घट

Patil_p

जेएलआरच्या नव्या गाडीचे बुकिंग सुरू

Patil_p

रिवोल्ट आरव्ही 400 चे प्री बुकिंग सुरु

Patil_p

जपानच्या कंपनीने बनवली उड्डाण घेणारी दुचाकी

Amit Kulkarni

आगामी वर्षात विक्रीत सुधारणा : ऑडी

Patil_p
error: Content is protected !!