Tarun Bharat

.हिरो मोटोकॉर्प वाढवणार किमती

१५०० रुपये महागणार दुचाकी ः १ डिसेंबरपासून वाढ

वृत्तसंस्था/ गुरुग्राम

भारतातील दुचाकी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी हिरो मोटोकॉर्प येत्या १ डिसेंबरपासून आपल्या दुचाकींच्या किमती वाढवणार असल्याची माहिती आहे. हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) निरंजन गुप्ता यांनी ही माहिती दिली
आहे.

येत्या १ डिसेंबरपासून हिरो मोटोकॉर्प आपल्या मोटरसायकल व स्कूटरच्या किमती साधारण पंधराशे रुपयेपर्यंत वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या किमती या मॉडेलनुसार वाढीव असणार असल्याचेही स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. अंतर्गत वाढणार्‍या खर्चावरती नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीने दुचाकीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण याचबरोबर कंपनीने वित्त सहाय्य योजना आकर्षक दरात ग्राहकांना देण्याचे निश्चित केले आहे. वाढलेल्या किमतीचा ग्राहकांवर जास्त परिणाम होणार नाही, अशी काळजी कंपनी घेणार असल्याचेही गुप्ता यांनी म्हटले आहे.

Related Stories

युपीआय पेमेंटस जूनमध्ये नेंदवला विक्रम

Patil_p

टेक महिंद्राकडून अलिस इंडिया, ग्रीन इन्वेस्टमेंट्स अधिग्रहणाला मंजुरी

Patil_p

सोनालिका ट्रक्टर्सच्या विक्रीत 47.8 टक्के वाढ

Patil_p

थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ

Patil_p

सॅमसंगची उत्पादने घ्या सवलतीत

Patil_p

बाजारातील मरगळ संपली

Patil_p