Tarun Bharat

हिवरे सत्तरी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर

एक महिन्यापासून ग्रामस्थाची पाण्यासाठी पायपीट

वाळपई / प्रतिनिधी

जवळपास नऊ लाख खर्चून दाबोस ते ठाणे पंचायत क्षेत्रासाठी नवीन जलवाहिनी टाकून सुद्धा सत्तरी तालुक्मयातील हिवरे बुद्रुक या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून पाण्याची तीव्र स्वरुपाची टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिक पूर्णपणे संतप्त बनले असून नागरिकांना जवळ असलेल्या नदीवर विहिरीवर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा खात्याने याची गंभीर दखल घेऊन पाण्याची ही समस्या दूर करण्यासाठी योग्य पावले न उचलल्यास कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. भागाचे पंचायत सभासद सत्यवान गावकर यांनीही यासंदर्भात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली असून यदाकदाचित नागरिकांनी उग्र रूप धारण केल्यास त्याची पूर्ण जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रात हिवरे बुद्रुक या गावाचा समावेश आहे. खासकरून ठाणे पंचायत क्षेत्रासाठी वारंवारपणे निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची समस्या यांच्या पार्श्वभूमीवर मागील ठाणे पंचायत मंडळातर्फे याठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. त्याची अंमलबजावणी करताना गोवा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नातून व स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांच्या सहकार्यातून सुमारे 9 कोटी खर्चून दाबोस ते ठाणे आदी दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी प्राप्त झाली होती. गेल्या चार वर्षापासून सदरचे काम सुरू आहे. सध्यातरी प्रायोगिक तत्त्वावर पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या जवळपास आठ महिन्यापासून यापाणीपुरवठा प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी हिवरे बुद्रुक येथील गावातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी हाल सहन करावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या चार दिवसापासून पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांना जवळच असलेल्या विहीर व नदीवर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे चित्र समोर आलेले आहे. दिवसभर नागरिक घागरी व बादल्या घेऊन पायपीट करीत पाणी आणत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान सदर गावात जाऊन एकूण परिस्थितीची माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला असता गावातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे .अचानकपणे पाणीपुरवठा समस्या निर्माण होण्याचे कारण स्पष्ट करताना नागरिकांनी सदर गावांमध्ये असलेला ऑपरेटर यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केलेला आहे. गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी असलेला ऑपरेटर बदलावा अशा प्रकारची वारंवार मागणी करूनही पाणी पुरवठा खात्याचा अधिकारी वर्ग मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तमाम नागरिकांनी केलेला आहे. खासकरून महिला भगिनी यामुळे अत्यंत संतप्त बनलेल्या असून एका बाजूने लाँकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे .अशाच अवस्थेत सध्या यागावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असताना व त्याकडे सरकारची संबंधित यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. दरम्यान भागाचे स्थानिक पंच सत्यवान गावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेला ऑपरेटर या समस्येसाठी जबाबदार आहे. अनेक वेळा विनंती व तक्रारी करूनही पाणीपुरवठा कार्यालयाचे अधिकारी वर्ग याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकर यांनी केलेला आहे.

9 कोटी खर्चुन खास जलवाहिनी तरीसुद्धा.

दरम्यान यासंदर्भात नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या माध्यमातून ठाणे पंचायत क्षेत्रासाठी जवळपास नऊ कोटी खर्चून खास जलवाहिनी टाकण्यात आलेले आहे. सदर जलवाहिनीचे काम सध्यातरी बऱयाच प्रमाणात पूर्णत्वास आलेली आहे. याभागात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात यावी यासाठी याजलवाहिनीला मंजुरी मिळून घेण्यात आली होती. मात्र असे असतानाही पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱयांच्या निष्काळजीपणामुळे गावाला पिण्याच्या पाण्याची समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप केला आहे. एकेकाळी यागावाला पिण्याच्या पाण्याची समस्या या संदर्भात अत्यंत दुःखदायक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ही जलवाहिनी टाकण्यात आल्यानंतर नागरिकांना काही प्रमाणात समाधानकारक पाणीपुरवठा होत होता. मात्र सध्यातरी ऑपरेटरच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

दरम्यान नागरिकांनी यासंदर्भात आपल्या तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करताना पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे. सध्यातरी 144 कलम गोव्यामध्ये लागू असले तरी गावामध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची समस्येच्या पार्श्वभूमीवर मोर्चा नेणार व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करून सरकार आमच्यावर कारवाई करीत असेल तर जरूर करु दे मात्र पिण्याच्या पाण्याच्या समस्या संदर्भात निर्माण होणाऱया गंभीर त्रास करण्याच्या दृष्टीकोनातून तर कोणत्याही प्रकारचे उपाय असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

Related Stories

अनेक स्थलांतरित पक्ष्यांची यंदा गोव्याकडे पाठ

Amit Kulkarni

वाचनालय हे उच्च शिक्षण घेण्याचे मुख्य केंद्र

Amit Kulkarni

ढवळी येथे बिबटय़ा घुसला घरात..!

Patil_p

राज्यात आजपासून नवरात्रोत्सव सुरु

Patil_p

मुरगाव मतदारसंघात भाजपासमोर धर्मसंकट

Amit Kulkarni

गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया

Amit Kulkarni