Tarun Bharat

हीच ती वेळ; राजकारण्यांनी समाजकारण करण्याची!

कोरोनाचा कहर सुरूच आहे. राजधानी बेंगळूरमध्ये तर उपचारासाठी एक बेड मिळविणे मुश्कील होत चालले आहे. म्हणून बाधितांना उपचारासाठी वेगवेगळय़ा जिल्हय़ात हलविण्यात येत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने 14 दिवसांचा जनता कर्फ्यू जारी केला आहे. 12 मे पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रोज सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. गेल्या वषीप्रमाणेच यंदाही वेगवेगळय़ा शहरातून कामगार खेडय़ाकडे जात आहेत. त्यामुळे खेडय़ांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. उपचारासाठी खेडय़ातून लोक शहराकडे येत आहेत. इस्पितळात बेड नाही, असे ऐकल्यानंतर त्यांची मती कुंठत आहे. सरकारी इस्पितळात उत्तम सेवा मिळत नाही. खासगी इस्पितळांचा दर परवडत नाही, अशी परिस्थिती आहे.

सध्या केवळ दोन आठवडय़ांचा जनता कर्फ्यू जारी करण्यात आला असला तरी परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णसंख्या कमी झाली नाही तर पुन्हा जनता कर्फ्यू वाढविण्याचा विचार होऊ शकतो. गेल्या वषीच्या लॉकडाऊनच्या आर्थिक धक्क्मयातून आता कुठेतरी सावरत असताना पुन्हा जनता कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिकतेवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या कर्नाटकातील परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणा पूर्णपणे परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. खासगी इस्पितळांची मक्तेदारी आणि मनमानी तर सुरूच आहे. कर्नाटकात अनेक साखर सम्राट, शिक्षण सम्राट व टोलेगंज इस्पितळे चालविणारे नेते सक्रिय राजकारणात आहेत. खरे तर माणूस आणि माणुसकी जगविण्याचे आव्हान प्रत्येकासमोर उभे आहे. अशा परिस्थितीत आपापल्या संस्था सेवेसाठी उपलब्ध केल्या असत्या, कमीत कमी खर्चात उत्तम सेवा दिली असती तर या नेत्यांना देवपण मिळाले असते. इतिहासात त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली असती. विजापूर येथील बीएलडीई शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी 3 ते 10 हजार रु. खर्चात आपले इस्पितळ कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खुले केले आहे. एप्रिलअखेरपर्यंत रोज 30 हजाराचा टप्पा ओलांडणार असा धोका तज्ञ समितीने व्यक्त केला होता. सध्याचे चित्र लक्षात घेता 32 हजाराच्या घरात नवे रुग्ण दाखल होत आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याच 3 लाखाच्या घरात पोहोचली आहे.

ऑक्सिजनचा तर मोठा तुटवडा भासतो आहे. कोरोना रुग्णावर उपचारासाठी लागणाऱया रेमडिसिविर इंजेक्शनचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. गेल्या वषी पीपीई किटची कमतरता भासली होती. यंदा ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. पुढे डॉक्टर आणि परिचारकांचा अभाव भासणार आहे, अशी भीती डॉ. देवीशेट्टी यांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्मयता आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. युद्धपातळीवर कामाला लागण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आपल्या देशात 78 टक्के तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. एका अंदाजानुसार 2 लाख परिचारिका व दीड लाख डॉक्टरांची सध्या गरज आहे. एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, नर्सिंग व पॅरामेडिकल विद्यार्थ्यांची सेवा घेतली तर परिस्थिती आटोक्मयात येणार आहे, असा सल्लाही देवीशेट्टी यांनी दिला आहे. कर्नाटकातील मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ समितीने सरकारकडे अनेक शिफारशी केल्या होत्या. तरीही परिस्थिती हाताबाहेर जाईपर्यंत त्याचा विचार झाला नाही. रुग्णसंख्या वाढताच जनता कर्फ्यू व इतर पर्यायांचा विचार सुरू झाला आहे.

विजापूर येथील एका पेंटर कुटुंबीयाच्या वाटेला कर्नाटकाच्या राजधानीत जी वेळ आली ती लक्षात घेता कर्नाटकात सध्या काय परिस्थिती आहे, राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात किती अपयशी ठरले आहे, हे लक्षात येते. बेंगळूर येथे पेंटींगचे काम करणाऱया एका कामगाराला खोकला, ताप आला. त्याच्या पत्नीने त्याला खासगी इस्पितळात दाखल केले. तातडीने 50 हजार रु. इस्पितळाने भरण्यास सांगितले. कसेबसे 20 हजार जमा करून बिल भरण्यात आले. तरी रुग्ण वाचला नाही. 4 लाख रु. बिल झाले आहे. ती रक्कम भरा आणि मृतदेह घेऊन जा, असे इस्पितळ प्रशासनाने सांगितले.

सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात राहून कुटुंबीय चौकशी करीत होते. ‘तुमचा रुग्ण बरा होतो आहे, त्याच्या आरोग्यात सुधारणा होते आहे’ असे सांगितले जात होते. 21 एप्रिल रोजी 39 वषीय पेंटरचा मृत्यू झाला. इस्पितळाने सांगितलेले 4 लाख रु. त्याच्या पत्नीला भरता आले नाहीत. मृतदेह तेथेच सोडून तिने विजापूर गाठले. 4 लाख रु. देऊन कुटुंबीय मृतदेह घेऊन जाणार, यासाठी पाच दिवस शवागारात मृतदेह ठेवण्यात आला होता. 4 लाख रुपये भरणे आम्हाला शक्मय होणार नाही, असे सांगत कुटुंबीयानी आपली असमर्थता सांगितली. 26 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करून इस्पितळ प्रशासनाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना कर्नाटकातील सद्यस्थिती दर्शविणारी आहे.

केवळ बेंगळूरच नव्हे तर प्रत्येक शहरात असे प्रकार पहायला मिळत आहेत. कोविड सेंटरच्या नावाखाली छोटेमोठे तंबू उभारून पैसे कमाविण्याचा धंदाही सुरू झाला आहे. येथे सेवा गौण दिसते. संपूर्ण मनुष्यकुळाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. महामारीचा फैलाव असाच वाढता राहिला तर मनुष्यकुळ टिकणार की नाही अशी भीती आहे. तरीही खासगी इस्पितळांच्या पैशांची भूक कमी होत नाही. कोरोना काळात समाजकारण करण्याची देवाने चांगली संधी दिली असता तिचा उपयोग करून घेऊन पुण्य पदरात पाडून घेण्याची बुद्धीही आता देवानेच इस्पितळ चालकांना द्यावी.

Related Stories

शिमोगातील तणाव अन् राजकीय वादंग

Amit Kulkarni

सोनम वांगचूक: वैकल्पिक विद्यापीठाचा कुलगुरु

Patil_p

‘स्तब्ध वसंत’ पुस्तकाची ‘विश्रब्ध’ ‘शारदा’

Patil_p

कलियुगाची आचारसंहिता – श्रीमद् भागवत

Patil_p

इच्छे सारिखा वीर आला

Patil_p

दुर्गे दुर्घट भारी…

Patil_p