Tarun Bharat

‘हीरोपंती-2’ ईदला होणार प्रदर्शित

टायगर श्रॉफ-तारा सुतारियाचा चित्रपट 

अभिनेता टायगर श्रॉप आणि तारा सुतारियाचा चित्रपट ‘हीरोपंती-2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. यासंबंधीची माहिती ताराने सोशल मीडियारव चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत दिली आहे. या पोस्टरमध्ये टायगर-तारा अत्यंत ग्लॅमरस दिसून येत आहेत. साजिद नाडियाडवालांचा ‘हीरोपंती-2’ ईदवेळी 29 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याचे ताराने सांगितले आहे. या चित्रपटाला अहमद खानचे दिग्दर्शन लाभले आहे.

डबल ऍक्शन, डबल मनोरंजनाचे वचन असे म्हणत टायगरनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हीरोपंती-2 च्या पोस्टरला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. या चित्रपटात टायगर जबरदस्त ऍक्शन करताना दिसून येईल. हा चित्रपट हीरोपंतीचा सीक्वेल असणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

टायगर याचबरोबर गणपत चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री क्रीति सेनॉनसोबत झळकणार आहे. विकास बहल यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित केला जाणार आहे.

Related Stories

डॉक्टर डॉनच्या सेटवर लकी अलीच्या गाण्यांची मैफिल

Patil_p

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना कोरोना; कुटुंबालाही लागण

Tousif Mujawar

तिरुपतिमध्ये विवाह करणार जान्हवी

Patil_p

ऑस्करच्या शर्यतीत ‘जल्लिकट्टू’ बाहेर

Patil_p

‘भारत बंद’ विरोधात कंगना म्हणाली…

Tousif Mujawar

‘खुफिया’मध्ये दिसणार तब्बू

Patil_p