Tarun Bharat

‘ही’ आहेत कोरोना संसर्गाची नवीन तीन लक्षणे

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना संसर्गाची नवीन तीन लक्षणे आता समोर आली आहेत. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने कोरोनाची नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या लक्षणात तीन नवीन घटकांचाही आरोग्य विभागाने विचार करावा, असे सिडीसीने म्हटले आहे. या नवीन लक्षणांमध्ये नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक, मळमळ होणे आणि अतिसारचा समावेश आहे. या तीन लक्षणांच्या आधारे आता करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे निदान करता येऊ शकणार आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोना लक्षणांमध्ये ताप, कफ, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे, अशी लक्षणे दिसत होती. त्यानंतर एप्रिलमध्ये सिडीसीने कोरोनाची नवीन सहा लक्षणे समोर आणली होती. त्यामध्ये थंडी वाजणे, थंडी वाजून अंग शहारणे, डोकेदुखी, चव किंवा स्वास संवेदना जाणे, स्नायुदुखी अशी लक्षणे होती. त्यानंतर आता सिडीसीने नाक चोंदणे किंवा वाहणारे नाक, मळमळ होणे आणि अतिसार ही लक्षणे सांगितली आहेत.

Related Stories

युरोपमधील एकमेव हुकुमशहा संकटात

Patil_p

दोन पाटलांनी घेतली अमित शहा यांची भेट

Archana Banage

कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक

Tousif Mujawar

सौदी अरेबिया : आंतरराष्ट्रीय विमानसेवा एक आठवड्यासाठी बंद

datta jadhav

ओबीसी समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- अजित पवार

Archana Banage

जगभरात 24 तासात सव्वालाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav