Tarun Bharat

…ही तर लोकशाहीची हत्या – राहुल गांधीचा मोदी सरकारवर घणाघात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर आज पुन्हा गदारोळ झाल्याचे दिसून आला. याच मुद्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपला निशाना करत जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकार खासदारांना कारवाईची भीती दाखवून विरोधक ज्यावर आवाज उठवू पाहात आहेत. त्यांच्यावर दबाव टाकत विरोधक चर्चा करू इच्छित आहे, ती चर्चा सरकार होऊ देत नाही.

तर धमकावून, भीती दाखवून त्यांना निलंबित करून सरकार काम करत आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. संसद सभागृहात चर्चा झाली पाहिजे सर्व मुद्द्य्यांवर चर्चा व्हायला हवी. परंतु जी चर्चा आम्ही करू इच्छित आहोत. ते आम्हाला करू दिलं जात नाही. सरकारवर आम्ही प्रश्न उपस्थित करायचं म्हटलं तर सरकार प्रश्न उपस्थित करू देत नाही.” याचबरोबर तीन-चार असे मुद्दे आहेत, जे की सरकार त्यांचं नाव देखील काढू देत नाही.

त्यासाठी जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जाते आहे. यामुळे ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. असं राहुल गांधी म्हणाले. दरम्यान आज राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा देखील काढला. या कारवाईत सर्वाधिक कारवाई राष्ट्रीय काँग्रेसच्या झालेल्या खासदारांची संख्या आहे.

Related Stories

शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला

datta jadhav

राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे 5 जण निलंबित

Patil_p

संवेदना अन् संघर्षाचे प्रतीक असलेले निवडणूक ‘चिन्ह’

Patil_p

राष्ट्रीय शिक्षण धोरणावर चर्चेसाठी तयार- मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

सोलापूर : पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत कडक संचारबंदी : जिल्हाधिकारी

Archana Banage

ठरलं! कसबा, चिंचवडसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

datta jadhav