Tarun Bharat

हुतात्म्यांना अभिवादन, मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

सीमाभागामध्ये कर्नाटक सरकारने 1 जून 1986 साली कन्नड सक्ती लागू केली. त्यामुळे सीमाभागात भव्य आंदोलन झाले. संपूर्ण सीमाभागातून कर्नाटक सरकार विरोधात संतापाची लाट उसळली. कर्नाटक सरकारच्या अत्याचारी पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. यामध्ये 9 हुतात्मे धारातीर्थ पडले. त्यांना सोमवार दि. 1 जून 2029 रोजी सकाळी 8 वाजता हुतात्मा स्मारक बॉक्साईट रोड, हिंडलगा बेळगाव येथे हजर रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी हुतात्म्यांना अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार आम्हाला हजर रहायचे आहे. तोंडाला मास्क तसेच सुरक्षित अंतर ठेवून अभिवादन करायचे असून साऱयांनी नियम पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आदींनी आवाहन केले आहे.

Related Stories

बेकिनकेरे-अगसगे संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

बेळगाव-चोर्ला मार्गाची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

विमानतळ विस्तारीकरण ः अद्याप केंद्राकडे प्रस्ताव नाही

Patil_p

खुनासाठी प्रेरणा ‘दृष्यम्’ सिनेमाची

Amit Kulkarni

आता बेळगाव – औरंगाबाद करता येणार हवाई प्रवास

Patil_p

आविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे संक्रांतीनिमित्त स्टॉलचा शुभारंभ

Patil_p