प्रतिनिधी / पणजी
केंद्र सरकारच्या अल्पसंक्मयांक मंत्रालयातर्फे कला अकादमी शेजारी कंपाल येथे भरलेल्या हुनर हाट व्यापार महोत्सवाचा आज समारोप झाला.
आध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतल्या कारागीरांच्या स्वदेशी आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱया अनोख्या वस्तू आणि उत्पादने या ’हुनर हाट’ मध्ये विक्री आणि आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध होत्या.
हस्तकला,कपडे,ज्व?लरी,चप्पल, गालिचे, क्रोकेरी, इतर हस्तकला वस्तू, शोभेच्या वस्तू, कृत्रिम फुले आदी स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी लोटली होती. मनोरंजनाच्या कार्यक्रमालाही रसिकांनी गर्दी दिसून आली.
शेकडो वाहने पार्क केल्याने पार्किंगसाठी जागा मिळत नव्हती.कला अकादमी समोरील मार्गावर वाहनांची रीघ लागल्याने वाहतूकही काही प्रमाणात ठप्प झाली होती. आज शेवटचा दिवस आणि त्यात रविवार असल्याने ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती.
विविध स्टॉलवर खरेदीही समाधानकारक झाल्याचे आढळून आले. जास्ततः खाद्यपदार्थांच्या स्टा?ल्सवर खवय्यांनी विविध खाद्यपदार्थ चाखण्यावर ताव मारला. याशिवाय महोत्सवात मांडण्यात आलेल्या विविध कलाकृतींसोबत सेल्फी काढण्याचा मोह महोत्सवात आलेल्यांना आवरला नाही.