Tarun Bharat

हुबळी अकादमी ब, एसएजी, बीडीके हुबळी क संघांचे सहज विजय

Advertisements

केएससीए सेकंड डिव्हीजन स्पर्धा : संतोषकुमार, शांतगौडा, आदित्यचे दमदार प्रदर्शन

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

हुबळी येथे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागिय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी हुबळी संघाने श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स हुबळी संघाचा दोन गडय़ांनी एसएजी संघाने भटकळ स्पोर्ट्स संघाचा 120 धावाने तर हुबळी क्रिकेट अकादमीने जानो पँथर्स क्रिकेट अकादमी गदग संघाचा 26 धावाने परावभ केला. संतोषकुमार डी., शांतगौडा पाटील, आदित्य एच. एन. यांच्या खेळाचे आज प्रमुख वैशिष्टय़
होते.

हुबळी येथील व्हीजीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री सिद्धारूड स्वामी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.1 षटकात सर्व गडी बाद 205 धावा केल्या. त्यात संतोषकुमार डी. ने 10 चौकारासह 77, श्रवण आर. ने 6 चौकारासह 28, अभिषेक एसने 2 चौकारासह 20, यल्लाप्पा काळेने 3 चौकारासह नाबाद 24 धावा केल्या.

बीडीके स्पोर्ट्स क्लब हुबळी तर्फे भुवन बसडोणीने 43 धावात 5, सुरन सामंतने 38 धावात 2, तर दीपक, वीरेश, वशिष्ट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरा दाखल बीडीके स्पोर्ट्स फौडेशन सी संघाने 49.3 षटकात 8 गडी बाद 207 धावा करून सामना दोन गडय़ाने जिंकला. त्यात शतक गुंजाळने 4 चौकारासह 83, विराज हावेरीने 2 चौकारासह 22, ऋषभ पाटीलने 2 चौकारासह 24, वशि÷ रामरियाने 1 षटकार 3 चौकारासह 21, दीपक निरालगीने 3 चौकारासह 18, शेखर शेट्टीने 14 धावा केल्या. सिद्धारूड स्वामी संघातर्फे पवन के व यल्लाप्पा काळे यांनी प्रत्येकी 2 तर अभिषेक बालकाईने 1 गडी बाद केला.

आरएनएस मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसएजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 38.4 षटकात सर्व गडी बाद 201 धावा केल्या. त्यात शांतगौडा पाटीलने 2 षटकार 8 चौकारासह 38, अस्लम एमने 1 षटकार 3 चौकारासह 34, अल्तमश कुरेसीने 1 षटकार 3 चौकारासह 24, सचिन पी ने 2 चौकारासह 14, करण ए ने 12 धावा केल्या. भटकळतर्फे सय्यद अखिबने 54 धावात 6, महंमद फसमने 42 धावात 2, रोहिदासने 54 धावात 2 गडी बाद
केले.

प्रत्युत्तरादाखल भटकळ संघाचा डाव 23.2 षटकात सर्व गडीबाद 96 धावात आटोपला. त्यात मोमीन दशवाफने 6 चौकारासह 30 सुमाश व एजाज अहमद यांनी प्रत्येकी 16 तर सय्यदने 10 धावा केल्या. एसएजीतर्फे अस्लम एम ने 19 धावात 4, शिवराज के ने 51 धावात 3 तर समिर जी 13 धावात 2 गडी बाद केले.

केएससीए मैदान हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी अकादमी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी बाद 277 धावा केल्या. त्यात आदित्य एच. एन. ने 5 षटकार 8 चौकारासह 67 चेंडूत 99, आकाश कट्टीमनीने 1 षटकार 3 चौकारासह 46, सुजल पाटीलने 2 षटकार 6 चौकारासह 51, मनीकांत बुकीटगारने 4 चौकारासह 27 तर कार्तिक ऊम्बीकाईने 2 चौकारासह नाबाद 19 धावा केल्या. जानो पँथर गदग संघातर्फे पवन कोपराळीने 37 धावात 2, प्रसाद कलबुर्गीनी 48 धावात 2 तर रियाज अहमद कोटबाल, चिन्मय कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल जानो पँथर क्रिकेट अकादमी गदग संघाचा धावा 47.2 षटकात सर्व गडीबाद 151 धावात आटोपला. त्यात रियाज अहमद कोटबालने 4 षटकार 7 चौकारासह 68, प्रल्हाद कुलकर्णीने 10 चौकारासह 49, प्रितम कुंभारने 4 चौकारासह 30, चिन्मय कुलकर्णीने 22, पवन कारोळीने 19, महांतेश व विरण्णा उप्पार यांनी प्रत्येकी 12 तर प्रसाद कलबुर्गीने 14 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमी ब संघातर्फे सचिन बर्कीने 41 धावात 3, विन्सन बी याने 32 धावात 2, अभिषेक यादवाडने 61 धावात 2 तर सुजल पाटील, विशाल राठोड व मनिकांत बुकीटगार यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Related Stories

स्वच्छतेसाठी मनपा आयुक्तांचा पाहणी दौरा

Amit Kulkarni

बेडकिहाळ आरोग्य केंद्राला सुविधारुपी व्हेंटिलेटरची गरज

Omkar B

सक्रिय रुग्ण संख्या दीड हजारांच्या उंबरठय़ावर

Patil_p

झेन स्पोर्ट्स-जीजी बॉईज आज अंतिम लढत

Amit Kulkarni

खानापुरात मंकर सक्रांतीसाठी बाजारपेठ झाली सज्ज

Patil_p

संस्कृती फौंडेशनच्या वतीने आहार-मास्कचे वाटप

Patil_p
error: Content is protected !!