Tarun Bharat

हुबळी विभागीय रेल्वेला मालवाहतुकीतून मोठे उत्पन्न

विभागीय व्यवस्थापकांनी दिली माहिती ः 4200 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची देशभरात वाहतूक

प्रतिनिधी / हुबळी

उत्तर कर्नाटकातील सर्व व्यवसाय आणि कृषीक्षेत्राशी संबंधित उत्पादनांची वाहतूक रेल्वेद्वारे होत असल्याने त्यांना भक्कमपणा प्राप्त झाल्याचे हुबळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला दक्षिण-पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिश हेगडे हे देखील उपस्थित होते.

हुबळी विभागाने 2.810 दशलक्ष टनाचे (1392 वॅगन्स प्रतिदिन) लोडिंग करण्यास यश मिळविले आहे. हे प्रमाण 68.9 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल महिन्यात विभागाचे मालवाहतुकीचे उत्पन्न 250.05 कोटी रुपये राहिले असून हा आकडा 77.49 टक्क्यांनी अधिक आहे. धातूच्या लोडिंगमध्ये 192 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे मालखेडे यांनी म्हटले आहे.

बीडीयूच्या निरंतर प्रयत्नांमुळे बागलकोट ते तामिळनाडूदरम्यान मालवाहतूक सुरू झाली आहे. या मार्गावर 2 मिनी रेक्स (2670 टन) लोड करून 33.79 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल महिन्यात साखरेची वाहतूक 0.106 दशलक्ष टन राहिली आहे. मागील वर्षात एप्रिल महिन्यातील आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 582 टक्क्यांनी अधिक आहे. देसूर, कोप्पळ, उगारखुर्द, बागलकोट, चिकोडी रोड, रायबाग आणि विजापूर येथून साखरेची उचल करण्यात आल्याची माहिती मालखेडे यांनी दिली आहे.

ऑक्टोबरपासून सलग 7 महिन्यांमये हुबळी विभागाचे पार्सल उत्पन्न 1 कोटी प्रतिमहिना राहिले आहे. एप्रिल महिन्यात हुबळी विभागाने 1.44 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. विभागाने गोव्यातील वास्को येथून हरियाणातील खोरीपर्यंत पार्सल वाहतुकीसाठी एनएमजी रेक्स वापरले आहेत. याचबरोबर पार्सल वाहतुकीसाठी 12 आयडीएलई जीएस रेक्स वापरून 98 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविले आहे.

7 लेव्हल क्रॉसिंग गेट्सच्या ठिकाणी रोड अंडर ब्रिजची निर्मिती करत सुरक्षेवर भर दिला आहे. यात बेळगावमधील 3 रोड अंडरब्रिज, बेळ्ळारीत 3 आणि धारवाड जिल्हय़ातील एका रोड अंडरब्रिजचा समावेश आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार विभागात अतिरिक्त रेल्वेगाडय़ा धावत आहेत. मे महिन्यात अतिरिक्त 3 विशेष रेल्वेगाडय़ा वास्को येथून दानापूर (पाटणा) पर्यंत धावल्या आहेत. तर विभागातील 42 टक्के कर्मचाऱयांचे लसीकरण झाले आहे. महामारीच्या काळात भारतीय रेल्वे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन विविध राज्यांमध्ये पोहोचवत आहे. 9 मेपर्यंत 4200 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची 268 टँकर्सच्या माध्यमातून देशभरात वाहतूक केली आहे. 120 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची क्षमता 6 क्रायोजेनिक कंटेनर्स टाटानगर येथून आज बेंगळूरमध्ये पोहोचणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला वरिष्ठ विभागीय कार्यकारी अधिकारी अरविंद हर्ले, विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक वेंकट राव, वरिष्ठ विभागीय इंजिनिअर उपस्थित होते.

Related Stories

पोवाडय़ातून जागविला शिवकाळ

Amit Kulkarni

लोकमान्य ग्रंथालयातर्फे म. फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

जीएसएस महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Amit Kulkarni

बागायतीला नरेगा योजनेची जोड

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 80 हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Amit Kulkarni

सेवाभावी डॉक्टर-सीएंचा यथोचित गौरव

Omkar B
error: Content is protected !!