Tarun Bharat

हुमरमळा महाशिवरात्रोत्सव यावर्षी गाव मर्यादितच

Advertisements

पारंपरिक धार्मिक विधी होणार

गावाबाहेरील व्यावसायिकांना बंदी

वार्ताहर / कुडाळ:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हुमरमळा (वालावल) येथील रामेश्वर देवस्थानचा महाशिवरात्र उत्सव गावापुरताच मर्यादित साजरा करण्यात येणार आहे. पारंपरिकतेनुसार धार्मिक विधी होणार आहेत. गावाबाहेरील व्यावसायिकांना दुकाने मांडण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती श्री रामेश्वर देवस्थान  स्थानिक उपसल्लागार समिती अध्यक्ष अमृत देसाई यांनी दिली.                              

कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. हे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या  संभाव्य  धोक्मयापासून सुरक्षित राहण्यासाठी कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र देवस्थान समिती (कोल्हापूर) यांनीही उपसमितांना  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने  हुमरमळा-वालावल येथे दरवषी उत्साहात व भाविकांच्या अलोट गर्दीत होणारा शिवरात्र उत्सव यावषी साधेपणाने व गावापुरताच मर्यादित साजरा करण्यात येणार आहे.

8 ते 12 मार्च असा पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. या कालावधीत करण्यात येणारी धार्मिक कार्ये फक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘कोविड-19’च्या नियमावली नुसारच होतील. या दरम्यान धार्मिक विधीवेळी व मंदिर परिसरात उपस्थित असलेल्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय आत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे. कोरोनाचा विचार करून यावषी गावाबाहेरील व्यक्तींना लहान मुलांसाठीचे मनोरंजनात्मक खेळ, दुकाने, हॉटेल्स लावण्यास सक्त मनाई आहे. पंचक्रोशीसह अन्य भाविकांनी या उत्सवात सहभागी न होता आपण आहात तेथूनच श्री देव रामेश्वराचे आशीर्वाद घ्यावेत व आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

Related Stories

लोकअदालतीत जिल्हय़ात 466 प्रकरणे निकाली

NIKHIL_N

कुडासे येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न

Anuja Kudatarkar

चिपळुणातील उड्डाण पुलास पुढील महिन्यात प्रारंभ!

Patil_p

“लव्ह मालवण” सेल्फी पॉईंट चे लोकार्पण

Anuja Kudatarkar

पत्नीच्या खूनप्रकरणी जामीन पुन्हा फेटाळला

NIKHIL_N

गांजा प्रकरणात युवकांचा सहभाग चिंताजनक

NIKHIL_N
error: Content is protected !!