Tarun Bharat

हुमरमळा-वालावल गाव विकासाचे मॉडेल!

कोरोना योद्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वार्ताहर / कुडाळ:

हुमरमळा (वालावल) गाव विकासाचे मॉडेल ठरले आहे. कोरोना काळात कोरोना योद्धय़ांचे काम तसेच दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यश या अशा हुमरमळा वासियांच्या पाठिशी शिवसेना नेहमीच राहील, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी तेथे दिली.             

हुमरमळा-वालावल शिवसेना व युवासेना आयोजित कोरोना योद्धा व दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तेथील रामेश्वर मंगल कार्यालय येथे झाला. त्यावेळी राऊत बोलत होते.

राऊत म्हणाले, कोरोना काळात ग्रा. पं., आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा सेविका यांनी जीवाची पर्वा न करता काम करून जनतेचे संरक्षण केले आहे, यासाठी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. दहावी-बारावी परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश संपादन केले. सरकारी कर्मचारी, कृषी सहाय्यक तसेच ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचा सन्मान व्हायला पाहिजे. कारण गावात काम करताना कितीतरी अडचणीना तोंड देत व मानसिक त्रास सहन करीत कोरोना काळात काम केले, म्हणून त्यांच्या कार्याला सलाम आहे. सरपंच अर्चना बंगे यांची काम करण्याची पद्धत आदर्शवत असून महिला बचतगटांच्या सदस्यांना एकत्रित ठेवण्याचे काम त्या करीत आहेत. अतुल बंगे यांचाही विकासकामांतील अनुभव याचा फायदा होत आहे.

आमदार वैभव नाईक यांनीही मार्गदर्शन केले. शिवसेनेचे जि. प. गटनेते नागेंद्र परब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अतुल बंगे, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी नगरसेवक सचिन काळप, सरपंच अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहलदीप सामंत, शाखाप्रमुख रमेश परब, युवासेना शाखाप्रमुख वीरेंद्र सावंत, ग्रा. पं. सदस्य कांता माडये, सोनाली मांजरेकर, शिल्पा मयेकर, गिरीजा गुंजकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, युवासेनेचे वालावल पं. स. मतदारसंघ विभागप्रमुख मीतेश वालावलकर, ग्रा. पं. सदस्य अमृत देसाई, नारायण राणे, रमा गाळवणकर, तलाठी परमेश्वर सलगरे, कृषी सहाय्यक सुद्रिक, पपू दळवी, भाऊ गुंजकर, माजी सरपंच प्रवीण मार्गी, संदीप प्रभू, अमित बंगे, प्रदीप राणे, मीनल परब, माजी सरपंच सुरेश वालावलकर उपस्थित होते.

Related Stories

भात कापताना सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

Patil_p

साटेली भेडशी ग्रामस्थांचा घेराव मागे

NIKHIL_N

प्रेमसंबंध नाकारल्याच्या रागातूनच सायलीचा खून

Anuja Kudatarkar

जमावबंदी व कोव्हीड-19 निर्गमित मनाई आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दोडामार्गात गुन्हे दाखल

NIKHIL_N

नांदगावात प्रौढावर खुनी हल्ला

Patil_p

दोन दुचाकींची धडक बसून सावंतवाडीत अपघात

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!