Tarun Bharat

सांगली : हुमा घुबड तस्करी प्रकरणी स्टिंग ऑपेरेशन करून पाच आरोपींना रंगे हात पकडले

‘पिपल फॉर अनिमल्स व बेळगाव वन विभाग दक्षता पथक यांच्या संयुक्तने स्टिंग ऑपेरेशन करून पाच आरोपींना रंगे हात पकडले’


सांगली / प्रतिनिधी

चिकोडी व कोल्हापूर येथून घुबड विकण्यासाठी आलेल्या पाच आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि, चिकोडी, निपाणी, बेळगांव, कोल्हापूर या भागात मोठया प्रमाणात वन्य जीव तस्करी केली जाते. पिपल फॉर अनिमल्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक लकडे यांना आपल्या विश्वनीय सूत्रांकडून घुबड विकण्यासाठी काही जण तयारीत आहेत अशी पक्की माहिती मिळाली. या बाबत वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ,दिल्ली वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी बेळगाव फ़ॉरेस्ट दक्षता पथकचे जिल्हा उपवन संवरक्षक शंकर कलोलीकर यांना माहिती देण्यात आली. पिपल फॉर अनिमल्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक लकडे, किरण नाईक, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अँड बसवराज होसगौडर व बेळगाव दक्षता पथक मिळून एकत्रित नियोजन करून चिकोडी येते सापळा रचला. बनावट ग्राहक म्हणून अँड बसवराज होसगौडर व वनअधिकारी सुरेश नाईक यांनी आरोपीना भेटले. हुमा घुबड असल्याचे खात्री झाल्यानंतर इशारा देताच मोठया शिताफीने दक्षता पथकने सर्व आरोपीना रंगे हात पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरज वडर, वय 20, रा.निपाणी,जि.बेळगांव , अरुण कोरवी, वय 33, रा. सदलगा,जि.बेळगावी, संदीप कोरवी, वय 25, रा. सदलगा,जि.बेळगावी,शुभम कांबळे वय – 25, रा. कागल,जि.कोल्हापूर, मयूर कांबळे, वय – 22, रा.कडालगा, जि.बेळगावी. गुण्याकामी वापरण्यात आलेले तीन स्प्लेंडर मोटार गाडी MH 09 DC 8581, KA 23 U 3744, KA 23 ED 8345 व चार मोबाईल असे एकूण 2 लाख रुपये मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. या स्टिंग ऑपरेशन बेळगाव जिल्हयाचे उपवन संवरक्षक ( DCF ) शंकर कलोलीकर व WCCB दक्षता समिती यांच्या मार्गदर्शनखाली बेळगांव दक्षता पथकचे वि.डी. हुद्दार, बी. वि. उलनावर, सुरेश नाईक, राकेश मुरारी, डि. आर. हंजी, गिरीश बनाड, सर्फराज जकती, रवी व चिकोडी रेंजचे वनअधिकारी विनय प्रधानी, प्रभू तंगडी, श्रीधर मुंडे, श्री दुर्गप्पा यांनी या कारवाई मध्ये सहभागी होते. आरोपी विरुद्ध वन्य जीव कायदा 1972 अंतर्गत अटक करून चिकोडी न्यायालयत हजर केले असता 4 दिवसाची वन कोठडी देण्यात आला आहे. पुढील तपास चिकोडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बसवराज उलन्नावर करत आहे. कोणतेही वन्य जीव शिकार, तस्करी करणे वन्यजीव कायदा अंतर्गत गुन्हा असून 3 ते 7 वर्ष पर्यंत शिक्षा व 10, 000 ते 25, 000 रुपये पर्यंत दंड आहे. असे वन्यजीव तस्करी कोणी जर करत असेल तर जवळच्या वन विभाग यांना कळवण्याचे आवाहन संस्थचे कायदेशीर सल्लागार अँड बसवराज होसगौडर यांनी केला आहे.

Related Stories

नागपंचमीमुळे पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल

Kalyani Amanagi

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Archana Banage

शिल्लक ऊस प्रश्नी युवक राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

Archana Banage

पूर पट्ट्यातील घरांच्या पुनर्वसनासाठी वडेट्टीवारांनी घेतला आढावा

Archana Banage

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय

Archana Banage

बेडगमध्ये तळ्यात आढळला महिलेचा मृतदेह

Archana Banage