Tarun Bharat

हृदयरुग्णांनो सावधान…!

हिवाळय़ामध्ये प्रकृतीमध्ये बदल होतात. हृदयाला काही समस्या निर्माण होतात. जर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा जर हृदयविकार असेल तर अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

थंड हवेमुळे रक्तवाहिन्या नसा आकुंचित पावतात त्यामुळे रक्त प्रवाहावर मर्यादा येतात. परिणामी हृदयाला प्राणवायुचा पुरवठा कमी होतो. कधी कधी हृदयाचे ठोके वाढून रक्तदाब वाढतो. अशावेळी हृदयाचे काम कठिण होते. बऱयाच जणांना सकाळच्या वेळी फिरण्याची, व्यायाम करण्याची, पळण्याची आवड असते. तथापि हृदयाचा त्रास असणाऱया व्यक्तींनी हिवाळय़ामध्ये या गोष्टी आवर्जुन टाळाव्यात असे डॉक्टर पट्टेद म्हणतात.

वैज्ञानिक संशोधनानुसार जेव्हा तापमान सर्वसामान्य पातळीपेक्षा खाली असते हृदयविकाराची शक्मयता वाढते. वर्षभराच्या तुलनेत थंडीच्या मोसमात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण 31 टक्क्मयाने वाढते. जर थंडीमुळे तुम्ही घरातच बसून राहणे पसंत करत असाल तर क्रियाशील राहा. हलका व्यायाम करा, तासा तासाने घरातल्या घरातच फिरा, एकाच जागी दीर्घकाळ बसण्याचे टाळा यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत राहील. असा सल्लाही डॉ. पट्टेद यांनी दिला आहे.

टीप्स…

  हिवाळय़ात पहाटेच्यावेळी फिरण्याचे टाळा.

 रात्रीचा प्रवास टाळा.

   ड्ड सूर्यप्रकाशात फिरण्याची सवय ठेवा.

  कोमट पाणी प्या.

 ताजे व गरम अन्न खा.

 ऊबदार कपडे वापरा व डोक्मयाला स्कार्फ बांधा.

 डोक्मयावर टोपी घाला. पायात सॉक्स घालून पावले गरम ठेवा.

 थंडी वाढली असेल तर हातांना ग्लोव्हज घाला आणि कान बंद करा.

Related Stories

सुसधूर ताकाची डेऱयातील घुसळण

tarunbharat

शोध सावलीचा

tarunbharat

इतिहास वेणुग्रामचा

tarunbharat

बिईंग रिस्पाँसिबल

tarunbharat

इंटरनेट विश्वाचा वेध…!

Patil_p

ही काळजी जरूर घ्या

tarunbharat