Tarun Bharat

हॅट्रीकचे स्वप्न पाहणार्‍या चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार : पालकमंत्री सतेज पाटील

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

पुणे पदवीधर मतदारसंघात हॅट्रीकचे स्वप्न चंद्रकांत दादांनी पाहू नये या वेळी त्यांची बोल्ड उडणार आहे असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला. शिवाजी पेठ येथील मतदान केंद्रावर भेटीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघात पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच निवडणूक मतदार नोंदणी पासून मतदाना पर्यंत मायक्रो प्लॅनिंग केले आहे. पुणे सोलापूर सांगली सातारा पक्षाची यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजय होतील असा दावा मंत्री पाटील यांनी केला.

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची मतदान केंद्रावर भेट झाली याविषयी विचारले असता एकमेकांना समोर आल्यानंतर नमस्कार करणे आदर भावना व्यक्त करणे यात गैर काही नाही याचा वेगळा अर्थ काढू नये अस ते यावेळी म्हणाले.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम, पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दशरथ पाटील यांची निवड

Abhijeet Shinde

महापूर ओसरतोय, महामार्ग सुरू

Abhijeet Shinde

संताजी घोरपडे स्वराज्याचे एकनिष्ठ योद्धे : प्रा. डॉ. जयसिंगराव पवार

Abhijeet Shinde

सव्वातीन तासांत 22 किलोमीटरची रंकाळा परिक्रमा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सहा हजार शून्य मिळकतींना जबाबदार कोण?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!