Tarun Bharat

हॅम्पशायरचा लियॉनबरोबरचा करार रद्द

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱया हॅम्पशायर संघाने ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनबरोबर यापूर्वी करार केला होता पण कोरोना व्हायरसमुळे लियॉनने इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपलब्ध होवू शकणार नाही, असे कळविले आहे. त्यामुळे लियॉन बरोबरचा हा करार हॅम्पशायरने रद्द केला आहे.

कोरोना महामारीने ब्रिटनला चांगलेच दमविले आहे. ब्रिटनमधील सर्व स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धा 28 मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. फिरकी गोलंदाज लियॉनने कसोटी क्रिकेटमध्ये 390 बळीं मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये तो तिसऱया स्थानावर आहे.

Related Stories

पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू सना मीरची निवृत्ती

Patil_p

फुटबॉल मैदानात धावायचंय,सरावात बदल करा

Archana Banage

कृष्णाला सुवर्ण, सुहासला रौप्यपदक

Patil_p

श्रीलंका-आयर्लंड आज महत्त्वाची लढत

Patil_p

संधी मिळाल्यास तिन्ही विश्वचषकात यष्टीरक्षण करेन

Omkar B

‘आठवे’ आश्चर्य नव्हे, पण नेपाळ सर्वबाद 8!

Patil_p