Tarun Bharat

हॅम्बुर्गच्या फुटबॉलपटूवर पाच सामन्यांची बंदी

बर्लिन

 मैदानावर आपल्या संघाचा पराभव झाल्यानंतर निराश झालेला हॅम्बुर्ग एसव्ही संघातील बचाव फळीतील फुटबॉलपटू टोनी लिस्टनेरने  बेशिस्त वर्तन करताना काही प्रेक्षकांना धक्काबुक्की करून शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने स्पर्धा आयोजकांनी लिस्टनेरवर पाच सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली असून त्याला आठ हजार युरोस (9,469 डॉलर्स) दंड करण्यात आल्याची माहिती जर्मन फुटबॉल संघटनेने शुक्रवारी दिली. जर्मन चषक फुटबॉल स्पर्धेत गेल्या आठवडय़ात झालेल्या सामन्यात हॅम्बुर्ग एसव्ही संघाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर  लिस्टनेरने एका फुटबॉल शौकीनाच्या जवळ जात त्याला अपशब्द वापरत त्याला धक्काबुक्की केली. या कारणास्तव लिस्टनेरवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. सेकंड डिव्हिजन क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील होणाऱया तीन सामन्यांमध्ये लिस्टनेरला खेळता येणार नाही.

Related Stories

वजनदार

datta jadhav

टी-20 वर्ल्ड कपसाठी 70 टक्के प्रेक्षकांना परवानगी

Patil_p

भारताची फिडे ऑनलाईन ऑलिम्पियाड फायनलमध्ये धडक

Patil_p

थॉमस जेतेपद इतिहासजमा, राष्ट्रकुल सुवर्ण हे पुढील टार्गेट

Patil_p

चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाचे आव्हान संपुष्टात

Amit Kulkarni

फिरकी गोलंदाजीनं अभिषेक गाजवतोय मैदान, कुचबिहार ट्रॉफीत गौरव

Abhijeet Khandekar