Tarun Bharat

हॅलेप, कोको गॉफ दुसऱया फेरीत

Advertisements

कोंटा, जॉर्जी पराभूत, बेरेटिनी, इस्नेर यांचेही विजय

वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस

गेल्या मेमध्ये पोटरीला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर रोमानियाच्या सिमोना हॅलेपने एटीपी-डब्ल्यूटीए सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिला विजय मिळवित आगेकूच केली. याशिवाय कोको गॉफ, पेगुला यांनीही विजय मिळविले तर जॉर्जी, जोहाना कोन्टा यांचे आव्हान समाप्त झाले.

हॅलेपने यापूर्वी तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिने मॅग्डा लिनेटचा 6-4, 3-6, 6-1 असा पराभव केला. हॅलेपने गेल्या आठवडय़ात माँट्रियल स्पर्धेतून पुनरागमन केले, पण पहिल्याच फेरीत तिला पराभवाचा धक्का बसला होता. अमेरिकेची किशोरवयीन खेळाडू कोको गॉफने सीह सु वेईचा 6-1, 6-2 असा फडशा पाडत पुढील फेरी गाठली. गॉफची पुढील लढत द्वितीय मानांकित नाओमी ओसाकाशी होणार आहे. पावसाचा व्यत्यय आल्याने अनेक सामन्यांचे आयोजकांना पुनर्नियोजन करावे लागले. 12 व्या मानांकित हॅलेपने 2015, 2016 व 2018 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिने लिनेटवर विजय मिळविताना 11 बिनतोड सर्व्हिस केल्या.

माँट्रियल स्पर्धा जिंकणाऱया कॅमिला जॉर्जीला मात्र येथे पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. तिला जेसिका पेगुलाने 6-2, 6-2 असे हरविले. माँट्रियलच्या उपांत्य फेरीतही याच दोघांत गाठ पडली होती. जॉर्जीप्रमाणे ब्रिटनच्या जोहाना कोन्टाचे आव्हानही संपुष्टात आले. झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने चुरशीच्या लढतीत कोन्टावर 3-6, 7-6 (7-5), 6-2 अशी मात केली. यापूर्वी येथे झालेल्या चारपैकी तीन वेळच्या स्पर्धेत कोन्टाला पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले आहे. 2020 मध्ये मात्र तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी ही स्पर्धा कोव्हिडच्या कडक निर्बंधाखाली न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती.

बेरेटिनीची विजयी सलामी

पुरुष विभागात विम्बल्डनची अंतिम फेरी गाठलेल्या मॅटेव बेरेटिनीने स्पेनच्या अल्बर्ट रॅमोस व्हिनोलसवर 6-7 (5-7), 6-3, 7-5 अशी मात केली. मांडीला झालेल्या दुखापतीनंतर त्याने या स्पर्धेत पुनरागमन केले. अन्य सामन्यात फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने सर्बियाच्या दुसान लॅजोविकचा 7-6 (7-0), 6-2 असा पराभव  केला. मोनफिल्सने या लढतीत नऊवेळा डबलफॉल्ट केले होते. ग्रिगोर डिमिट्रोव्हने दुसरी फेरी गाठताना स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटचा 6-3, 6-4 असा पराभव केला तर अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्दाने सर्बियाच्या लास्लो डेअरवर 6-4, 6-4 अशी मात केली. त्याची लढत सित्सिपसशी होणार आहे. टोरांटो स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या जॉन इस्नेरने पाठदुखीवर मात करीत ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीला 4-6, 7-6 (7-5), 6-4 असे हरविले. इस्नेरने या सामन्यात 26 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याची पुढील लढत इटीच्या यानिक सिनरशी होणार आहे.

Related Stories

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p

स्टीनच्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत तेंडुलकर, द्रविड यांना स्थान

Patil_p

गावसकर म्हणतात, पारदर्शकता ठेवा!

Patil_p

युपी योद्धाज-गुजरात आज लढत

Patil_p

स्टॉपेज टाईममध्ये नेमारसह 5 खेळाडूंना रेड कार्ड

Patil_p

साई अकादमीचे 11 गोल

Patil_p
error: Content is protected !!