Tarun Bharat

हेडलॅण्ड सडय़ावर भटक्या गुरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, एकाला वाचवण्यासाठी लोकांची धावपळ

Advertisements

प्रतिनिधी / वास्को

हेडलॅण्ड सडा भागात भुटकी गुरे दगावण्याचा प्रकार शनिवारी सकाळी आढळून आला. सीएचएलडी कॉलनी व इतर ठिकाणी मिळून दोन गुरे विव्हळत विव्हळत मरण पावली. एका गाईला अत्यवस्थ अवस्थेत ध्यान फांऊडेशनकडच्या ताब्यात देण्यात आले. या गुरांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

वास्को परीसर तसेच हेडलॅण्ड सडा परीसरात भटक्या गुरांची संख्या वाढलेली असून ही गुरे पोट भरण्यासाठी आणि पुरेसा पाणी पिण्यासाठी भटकत असतात. त्यांच्यासाठी पुरेस खाद्य उपलब्ध होत नसल्याने ही गुरे प्लास्टीकसह वाटेत मिळेल ते खात असतात. त्यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. हेडलॅण्ड सडय़ावर अचानक मृत्यू पावलेली गुरे असेच काही बाही खाल्ल्याने दगावली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सडय़ावरील सीएचएलडी कॉलनी आणि तेथील समोरच्याच कॉलनीमध्ये दोन गुरे तडफडत मरण पावली. तर पांडववाडा वस्तीत एक गाय व्हिवळत असताना लोकांनी पाहिल्याने त्यांनी शांतीनगर वास्कोतील पिपल फॉर ऍनिमल्स या संस्थेच्या सेवकांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ती गाय मृत होण्याची शक्यता असल्याने त्वरीत या संस्थेच्या डॉक्टरला बोलावण्यात आले. सदर गायीवर त्या ठिकाण उपचार करणे कठीण असल्याने व ती कोणत्याही क्षणी दगावण्याची शक्यता असल्याने अखेर केपेच्या ध्यान फाऊडेशनच्या केंद्रात ती हलवण्याचे लोकानीच ठरवले. मात्र, त्यासाठी वाहन उपलब्ध झाले नाही. शेवटी ध्यान फाऊडेशनचे सेवक हेडलॅण्ड सडय़ावर आपल्या वाहनासह आले व त्या अखेरच्या घटका मोजणाऱया गायीला घेऊन गेले. या कामात स्थानिक लोकांनीही आर्थिक मदत केली.

Related Stories

तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे कोसळले

Omkar B

कुडचडेतील मलनिस्सारण प्रकल्पाची पायाभरणी

Amit Kulkarni

नड्डा यांची मंत्री, आमदारांशी चर्चा

Patil_p

आज सूर्यग्रहण : नागरिकांमध्ये उत्सुकता

Amit Kulkarni

गोमेकॉतील आक्सिजनची समस्या सोडविणार

Amit Kulkarni

मडगाव पालिकेवर गोमंतकीय विक्रेत्यांचा मोर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!