Tarun Bharat

हेब्बाळजवळ अपघातात बेळगावच्या तरुणाचा मृत्यू

नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव

हेब्बाळ (ता. खानापूर) जवळ झालेल्या मोटार सायकल अपघातात हिंदूनगर, टिळकवाडी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

यश परेश देशपांडे (वय 20) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात आई, वडिल, आजी, आजोबा असा परिवार आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी  मोटार सायकलवरुन पडून हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

उपचाराचा उपयोग न होता रात्री त्याचा मृत्यू झाला. नंदगड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून खानापूरचे मंडल पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

जिल्हाधिकाऱयांकडून मतदान केंद्रांची पाहणी

Omkar B

टॅक्सी ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

निर्मल ग्राम पुरस्कार यंदा मिळणार की नाही?

Omkar B

गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी 6 पासून लिलाव

Amit Kulkarni

यंदा वरुनराजाची बळीराजाला साजेशी साथ

Patil_p

वैद्यकीय कचरा टाकला भरवस्तीत

Amit Kulkarni